चेहऱ्यावर येणाऱ्या सततच्या घामामुळे हैराण आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून दूर करा समस्या

sweating on face tips – व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपण सर्वांनी अनेकदा ऐकले असेल, ते फक्त बोलण्यापुरते नाही तर खरेही आहे. साधी गोष्ट घाम येणे ही नैसर्गिक क्रिया आहे. उन्हाळ्यात घाम येणे अगदीच स्वाभाविक आहे पण काही लोकांना अति घाम येण्याची समस्या असते.

काहींना चेहऱ्यावर खूप घाम येण्याची समस्या असते. तर काहींना अंगाला खूप घाम येण्याची समस्या असते. घाम येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. पण चेहऱ्यावर जास्त घाम आल्यास त्यामुळे फोड, मुरूमे येऊ शकतात.

चेहऱ्यावर घाम का येतो?

मुळात चेहऱ्यावर अतिघाम येणे ही एक समस्या आहे जी क्रॅनिओफेशियल हायपरहायड्रोसिसमुळे निर्माण होते. याला अनेक कारणे असतात हवामानातील बदल, ताणतणाव, औषधांचा दुष्परिणाम, धूम्रपान, घामाच्या ग्रंथी अतिसक्रीय असणे यामुळे घाम जास्त येतो.

त्याशिवाय स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था तसेच इतर कारणे जसे लठ्ठपणा, सांसर्गिक आजार, रक्तातील कमी साखऱ, थायरॉईड, स्ट्रोक, पार्किन्सन्स, ल्युकेमिया या आजारांमुळेही घाम अधिक प्रमाणात येतो. शरीराच्या कार्यप्रणालीत बिघाड झाल्याने घाम येण्याची समस्या उद्भवते.

काही वेळा चेहऱ्याव्यतिरिक्तही व्यक्तीला घाम येतो. रात्री झोपताना घाम येणे, शरीराच्या केवळ एकाच भागाला जास्त घाम येणे, जास्त घाम येण्यासाठी मज्जासंस्थाही कारणीभूत असू शकतो तो कार्यप्रणालीत बिघाड झाल्या. हायपरिड्रोसिसची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रियाही केली जाते. त्यात घामाच्या ग्रंथी काढल्या जातात. त्यामुळे भविष्यात व्यक्तीला ही समस्या भेडसावत नाही. मात्र त्या व्यतिरिक्तही काही साधे उपाय किंवा पथ्य पाळली तर ही समस्या आपण सहजपणे हाताळू शकतो.

चेहऱ्यावर येणार घाम टाळण्याचे उपाय

ज्यांना चेहऱ्यावर जास्त घाम येण्याची समस्या भेडसावत असेल त्यांनी खूप गरम होणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावूनही घाम येणे थांबवू शकतो. टोमॅटोचा रस लावल्याने त्वचेची छिद्र बंद होतात आणि घाम कमी येतो. काही वेळा मानसिक समस्या, वैयक्तिक ताण तणाव यामुळेही चेहऱ्यावर जास्त घाम येण्याची समस्या निर्माण होते.

अशा लोकांनी मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यानधारणा, योगअभ्यास करावा. त्याचा फायदा मानसिक समस्या हाताळण्यासाठी होऊ शकतो. घाम हा शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकतो, मात्र प्रमाणापेक्षा अधिक घाम येणे म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्यामुळे चेहऱ्यावर खूप जास्त घाम येत असेल तर पाणी पुरेसे प्यावे, असे केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

या काही उपायांनी आपण चेहऱ्यावर येणाऱ्या घामाची समस्या हाताळू शकतो. मात्र तरीही डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यावर उपाय जरूर करावेत.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole