PSI Syllabus 2021 | MPSC Police Sub Inspector Exam Pattern

MPSC PSI Syllabus 2021 is as below can be read and also available to download in pdf format. Exam Syllabus and Previous year question papers are key factors which will help to understand exam and crack it. Most of MPSC Toppers have said that undersand syallabus and you will understand exam.
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा
Maharashtra Subordinate Services, Gr. B
(Non-Gazetted) (Pre) & (Main) Competitive Exam
परीक्षेचे टप्पे:- १) संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण २) मुख्य परीक्षा – ४०० गुण (पेपर क्र.-१ संयुक्त व पेपर क्र.२ स्वतंत्र)
परीक्षा योजना
प्रश्नपत्रिकेची संख्या – एक
विषय व संकेतांक | गुण | प्रश्नसंख्या | माध्यम | दर्जा | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरुप |
सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र. ०१२) | १०० | १०० | मराठी व इंग्रजी | पदवी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
PSI Syllabus (अभ्यासक्रम)
- चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
- नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
- इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
- भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांशरेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
- अर्थव्यवस्था –
- भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
- शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
- सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
- बुध्दिमापन चाचणी व अंकगणित
- बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
- अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी.
परीक्षा योजना
प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन
एकूण गुण – ४००
पेपर क्र.-१ (संयुक्त पेपर) -२०० गुण
पेपर क्र.-२ (स्वतंत्र पेपर) -२०० गुण
पेपर क्र. व संकेतांक | विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | कालावधी |
१ (संकेतांक ०१४) | मराठी | १०० | ५० | मराठी – बारावी | मराठी | एक तास |
१ (संकेतांक ०१४) | इंग्रजी | ६० | ३० | इंग्रजी – पदवी | इंग्रजी | एक तास |
१ (संकेतांक ०१४) | सामान्य ज्ञान | ४० | २० | पदवी | मराठी – इंग्रजी | एक तास |
२ (संकेतांक ५०५) | सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान | २०० | १०० | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
- मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
- इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage
- सामान्य ज्ञान
- चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
- माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५
- संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळया क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कीग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
- बुध्दिमत्ता चाचणी
- महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान(Climate), पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकिय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.
- महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.
- भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची | महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिकसांस्कृतिक- धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
- महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (Maharashtra Police Act)
- भारतीय दंड संहिता, १८६० (Indian Penal Code)
- फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (Criminal Procedure Code)
- भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ (Indian Evidence Act.)
DOWNLOAD : PSI Question Papers [ALL]