माश्यांचे सेवन केल्याने वाढते मेंदुची कार्यक्षमता; ‘या’ समस्यांपासूनही होईल सुटका

Consumption of fish in marathi – भारतीय उपखंडात आहार हा चौरस असावा असा आग्रह धरला जातो. आपल्या देशात आहार संस्कृती व्यापक आहेच पण त्यात विविधताही आहे. त्यामुळे प्रांतानुसार खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे बहुतांश भागात मिश्रहारी म्हणजे शाकाहार आणि मांसाहार करणारी लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

मांसाहारामध्ये परमेश्वराचा पहिला अवतार म्हणजे मच्छी बहुतेकांना प्रिय असते. सागरकिनाऱ्यावर वसलेल्या कोकणात तर मासेखाऊंची चंगळ असते. विविध प्रकारची मासळी त्यांना खायला मिळते. माशांचे सेवन हे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. माशांमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात.

ओमेगा ३ फॅटी अँसिड

बऱ्याचदा आपण कॉर्ड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेण्यास सांगितले जात असल्याचही पाहिलं असेल कारण माश्यामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अँसिड. मनुष्यप्राण्यासाठी आवश्यक असलेले हे अँसिड माणूस स्वतःच्या शरीरात निर्माण करू शकत नाही, त्यामुळे त्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे काही विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने शरीरातील याची कमतरता भरून काढता येते.

माशांमध्ये हेच ओमेगा ३ फॅटी अँसिड मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळेच माश्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. माशांमध्ये इतरही काही पोषक तत्वे आहेत. त्यामुळे माशांचा आहारात नियमितपणे समावेश असावा.

कर्करोगापासून बचाव

अर्थात कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हे घातक ठरते तसेच माश्यांबाबतही होऊ शकते. मर्यादित सेवन खूप फायदेशीर ठरते. मासे खाल्ल्यास ओमेगा ३ फॅटी अँसिडस् मिळतात. ही फॅटी अँसिडस शरीरातील कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात. साहाजिकच कर्करोगापासून बचाव करण्यासाठी याची मदत होते.

मेंदू तीक्ष्ण होतो

मानवी मेंदूसाठी माश्याचे सेवन उत्तम आहे. मासे खाल्ल्याने मेंदूची क्षमता वाढते. माशांमधल्या प्रथिनांमुळे नव्या पेशींच्या निर्मितीला मदत होते. मासे सेवन केल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, त्यातील फॅटी अँसिडमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

माश्यांच्या सेवनामुळे आपल्याला मानसिक विकारांमध्ये फायदा होऊ शकतो. भावनिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी माशांचे सेवन उपयुक्त ठऱते. नैराश्य, तणाव, चिंता आदी विकार कमी होण्यास मदत होते.

केसाचे विकार दूर

केसाचे विकार दूर करण्यासाठीही मासे उपयुक्त आहार ठरू शकतात. केसाच्या समस्या कमी करण्यासाठी माश्यांचे सेवन जरूर करावे.
त्वचेच्या समस्यांवर माश्याचे तेल/फिश ऑईल लावल्याचा फायदा होतो. त्वचेच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यासाठीही मासे नियमितपणे सेवन करावेत.

नियमित माशांचा समावेश

नियमित माशांचा आहारात समावेश केल्यास शरीराचे संतुलन राहाते. रक्तदाब, मधुमेह या सारख्या आजारांपासूनही संरक्षण होते. तसेच नियमित मासे खाणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग आणि स्ट्रोक येण्याचा धोका तुलनेने कमी असतो. ओमेगा थ्री फॅटी अँसिड आणि ई जीवनसत्त्व यामुळे मासे आरोग्यासाठी फायदेशीर असतात मात्र त्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळावे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole