‘या’ टिप्स वापरून आपल्या ओठांची काळजी घ्या.

लिंबू आणि साखर- 

हा नैसर्गिक घरगुती उपाय त्वचेच्या मृतपेशी दूर करण्यास मदत करतो. लिंबाचा रस आणि साखर यांची पेस्ट करून ती हलक्या हाताने ओठांवर लावून चोळावी. दोन तीन मिनिटांनंतर ओठ थंड पाण्याने धुवावेत. त्यामुळे ओठ मऊ होतील. 

साजूक तूप- 

साजूक तूप हा त्वचेसाठी उत्तम पोषण देणारा घटक आहे. साजूक तुपाची मालिश सौदर्य वाढवणारी असते. त्यामुळे रोज झोपताना एक थेंबर साजूक तूप घेऊन त्याने ओठांवर मालिश करावी. तूप जिरले पाहिजे. त्यामुळे ओठांचा रंग उजळतो. 

हळद मध-

हळद ही रोग प्रतिबंधक असतेच त्यामुळे ओठाला हळद आणि मध एकत्र करून चोळावी. दोन तीन मिनिटे तशीच राहू द्यावी. त्यानंतर धुवून टाकावे. हळदीतील अँटीऑक्सिडंटस् ओठांवरच्या भेगा दूर करण्यास मदत करतात. तर मधामुळे ओठाचा काळेपणा दूर होतो आणि त्यांचा मूळ गुलाबी रंग कायम राहाण्यास मदत होते. 

मॉश्चरायझर- 

याचा वापर तुपाप्रमाणे करता येतो. रात्री झोपताना ओठांवर मॉश्चरायझर लावावे. त्यामुळे ओठांना भेगा पडल्या असतील तर त्या बुजतील आणि ओठांचा ओलावा टिकून राहिल. लिप बाम देखील यामध्ये वापरता येईल. 

लवंग तेल-

ओठ मऊ होण्यासाठी लवंग तेलाचा उपयोग करता येऊ शकतो. हे तेल वापरताना लिप बाम मध्ये मिसळून वापरावे. कारण लवंग तेल उष्ण असते. पण लिप बाममध्ये वापरल्यास त्याचा त्रास होणार नाही. 

मेन्थॉल-

ओठी गुलाबी आणि घट्ट दिसण्यासाठी ओठांवर मेन्थॉल लावू शकता. त्यामुळे ओठांना इजा होणार नाही. ओठ मऊ आणि सुंदर दिसतील. 

दालचिनी-

दालचिनीचेही तेल मिळते, ओठ मऊ होण्यासाठी त्याचा वापर करू शकता. मात्र हे तेलही उष्ण असल्याने थेट ओठांवर लावल्यास जळजळ होणे, ओठ सुजणे आदी त्रास होऊ शकतात. त्यामुले पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम मध्ये मिसळून हे तेल लावावे. 

बीट- 

बीटाचा रंग गडद गुलाबी असतो. हातही त्यामुळे लाल होतात. ओठांवर वापर कऱण्यासाठी एक चमचा बीटाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करावे. छान मिश्रण करावे. ओठांना लावण्यापुर्वी कापसाने ओठ पुसून घ्यावे. व या मिश्रणाने ओठांची मालिश करावी. रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी धुवून टाकावे. तेव्हा ओठ गुलाबी आणि मऊ झालेले जाणवतील. 

कोरफड-

कोरफडीचे जेलही उत्तम मुलायमपणा देते त्यामुळे बाजारात मिळणारे कोरफड जेलही ओठाला लावू शकता. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole