रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? मग झोपल्या झोपल्याच ‘या’ पद्धतीनं वजन घटवा

Weight loss in Marathi – नियमित व्यायाम ही आरोग्याची गुरूकिल्ली हे वाक्य कितीही वेळा ऐकलं तरीही ते अंगी बाणवण्यात आपण माणसं कमी पडतो. त्यात जीवनशैलीतले बदल इतक्या झपाट्याने झाले आहेत की त्याचा परिणाम म्हणून वाढते वजन आणि आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत.

लठ्ठपणा ही त्यातली अगदी सामान्य समस्या आहे. त्यासाठी विविध व्यायाम प्रकारांबरोबर प्रत्येकाला सहज परवडण्यासारखा आणि सोपा प्रकार म्हणजे मॉर्निंग वॉक किंवा चालायला जाणे. काही जण त्याला डाएटची जोडही देतात. पण व्यायामासाठी किंवा चालण्यासाठीही वेळ नाही अशा व्यक्तीसाठी एक चांगली बातमी म्हणजे उत्तम झोपेच्या मदतीने आपण वजन कमी करू शकतो.

झोप ही माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते, पण बऱ्याचदा झोपेबाबत काँप्रमाईज केले जाते. एका अहवालानुसार झोपलेल्या व्यक्तीचे वजन ८३ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, अर्थात हे फक्त गाढ झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. झोपताना श्वास, घाम आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे व्यक्तीचे वजन कमी होते. व्यक्तीनुरूप चयापचय दर कमी जास्त असतो, झोपेत वजन कमी होणं हे त्या दरावरही अवलंबून असते.

झोपेच्या बाबतीत काही निकष पाळले तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

झोपेची वेळ

अपुरी झोप, उशिरा झोपणे यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो त्यामुळे अनेक समस्याही उद्भवतात. त्यासाठी झोपेची वेळ ठरवून घ्या, ठराविक वेळी शरीर आपोआप झोपेसाठी तयार होते. व्यक्तीला कमीत कमी सात ते आठ तास झोप गरजेची असते. वजन कमी करण्यास ती गरजेची आहे.

गाढ झोप

झोपेच्या गुणवत्तेमध्ये शांत, गाढ झोप लागणे अपेक्षित असते. बऱ्याच लोकांना झोप लागताना आवाज झाला, उजेड असेल तर त्यांना झोप लागत नाही. त्यामुळे झोपण्यापुर्वी नियोजन केल्यास गाढ झोप लागण्यास मदत होईल.

झोपण्याआधी काय खाणे टाळावे

अनेकांना झोपण्यापुर्वी चहा, कॉफी सारखी पेये घेण्याची सवय असते. परंतू यामध्ये उत्तेजक घटक असल्याने त्याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापुर्वी सुपाच्य, हलका आहार घ्यावा. हलके अन्न सेवन केल्याने चयापचय क्षमतेत वाढ होते. त्यामुळे झोपेतही कॅलरी बर्न होतात. त्यामुळे उत्तेजक पेये टाळावीत.

वातावरण

गाढ झोप लागण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करा. थंड वातावरण असेल तेव्हा शरीराची चयापचय क्रिया वाढते. साहाजिकच कॅलरी बर्न होतात. थंड तापमानात झोपल्यानंतर शरीराला अतिरिक्त साखरेपासून मुक्ती मिळते.

जेवल्यानंतर शतपावली

सध्याच्या वेगवान आयुष्यात जेवण झाल्यानंतर दमल्यामुळे माणसाचा लगेच झोपायला जाण्याकडे कल वाढलाय. याचा परिणाम पचनशक्तीवर होत असल्याने अन्न पचायला त्रास होतो. त्यामुळे अन्न पचत नाही. म्हणून जेवण आणि झोप यांच्यामध्ये दोन तीन तासाचे अंतर असले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरही देतात.

झोपेबाबत या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत होईल. कारण व्यायाम करूनही, चालायला जाऊनही वजन कमी होत नसेल तर आपल्या झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता चांगली आहे का हे तपासून पहायला हवे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole