WhatsApp वर तिसरंच कोणी तरी वाचतंय का तुमचे मेसेज? लगेच चेक करा ही सेटिंग

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp Tricks) आल्यापासून माध्यमांच्या विश्वात क्रांती झाली. वापरायला सोपं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप जवळपास सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये दिसू लागलं. या अ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणं, फोटो-व्हिडिओ पाठवणं, व्हॉईस चॅट करणं इतकं सोपं झालं की, इंटरनेट असणारा मोबाईल ही गरजेची वस्तू झाली.

सुरक्षेच्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅपमध्येही काही बदल झाले. एंड-टू-एंड (End-to-End Encryption) एनक्रिप्टेड मेसेज हे त्यापैकीच एक. इतकं सगळं असूनही व्हॉट्सअ‍ॅप अजूनही असुरक्षित असू शकेल का? तुमचं व्हॉट्सअ‍ॅप दुसरं कोणी वापरू शकेल का?, असे प्रश्न पडत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप दुसरं कोणी वापरत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतील. या गोष्टी कोणत्या आहेत, ते पाहूया.

  • डिजिटल माध्यमाच्या वापराचे अनेक फायदे असले, तरी याचे काही तोटेही आहेत. अर्थात याबद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळेही काहीवेळा चुका घडतात. तसाच प्रकार व्हॉट्सअ‍ॅपबाबतही आहे. व्हॉट्सअ‍ॅप तर सगळेच वापरतात. अगदी लहान मुलांनाही आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येतं, तसंच ते अनेक ज्येष्ठांच्या विरंगुळ्याचं हे साधन झालं आहे. त्यामुळेच ते जबाबदारीनं आणि योग्य पद्धतीनं वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
  • काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपनं एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेज अशी सोय वापरणाऱ्यांना दिली. या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षितता वाढली, पण अजूनही ते पूर्ण सुरक्षित नाही. त्याला कारण म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप वेब (What’s App Web) हे त्यातील नवीन फीचर. व्हॉट्सअ‍ॅप वेबमुळे मोबाईलवरचं व्हॉट्सअ‍ॅप लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर वापरता येतं.
  • ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसीठी हे अतिशय सोयीचं आहे. कारण तुमच्या मशीनवर नेहमी लॉग इन (Log In) करण्याची गरज नसते. याच गोष्टीमुळे ते इतर कोणी वापरण्याची शक्यताही असते. एखाद्यावेळी तुमचा फोन दुसऱ्याकोणी घेतला व तो अनलॉक असेल, तर व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या माध्यमातून कोणीही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकेल.

आपलं अ‍ॅप इतरही कोणी पाहत आहे का? हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचीच मदत होईल. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लिंक्ड डिव्हाईस (Linked Devices) या ऑप्शनमध्ये गेल्यावर तुमच्या फोनशी कोणकोणती डिव्हाईस जोडलेली आहेत, याची माहिती मिळेल. त्यात तुमच्या माहितीत नसलेलं एखादं डिव्हाईस असेल, तर तुम्हाला ही गोष्ट लगेच लक्षात येईल व ते डिव्हाईस तुम्ही लगेच डीलिंकही करू शकता म्हणजे काढूनही टाकू शकता.

तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज इतर कोणी वाचत आहे का? हे जाणून घेणं खूपच सोपं आहे. त्यासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचीच मदत घ्यावी लागेल. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षितता तुम्हाला सांभाळता येईल.


हे हि वाचा –

1 Comment
  1. 8431817321 says

    Anand jore

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole