MPSC च्या ‘या’ पदांसाठी मोठी संधी; 10 वी पास करू शकतात अप्लाय!

MPSC Steno Recruitment 2022 – महाराष्ट्र राज्य सरकारच्या विभागामध्ये नोकरीची (Majhi Naukri) संधी निर्माण झाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध पदांसाठी (MPSC Recruitment 2022) अर्ज मागवले आहेत. यामध्ये स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी), स्टेनो-टायपिस्ट (मराठी) आणि स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी) या पदांचा समावेश आहे. कोविड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा नव्याने नोकरी शोधत असलेल्या अनेकांना नोकऱ्या मिळाल्याच नाहीत. अशा व्यक्तींसाठी या भरतीद्वारे चांगली संधी निर्माण झाली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) नियमितपणे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती काढल्या जातात. त्याच पद्धतीने या वेळी MPSC तर्फे विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC Recruitment 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना mpsc.gov.in या MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पदांसाठी (MPSC Recruitment 2022) अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांना या पदांसाठी (MPSC Recruitment 2022) अर्ज भरता येऊ शकणार आहे. तसंच https://mpsc.gov.in/downloadFile/english/4878 या लिंकवर क्लिक केल्यास उमेदवारांना या भरतीची अधिकृत अधिसूचना (MPSC Recruitment 2022) पाहता येणार आहे. या भरती (MPSC Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 253 पदं भरली जाणार आहेत. त्यामध्ये 62 उच्च श्रेणी स्टेनोग्राफर पदं , 100 निम्न श्रेणी स्टेनोग्राफर पदं, मराठी स्टेनो-टायपिस्टची 52 पदं आणि इंग्रजी स्टेनो-टायपिस्टची 39 पदं भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता, तसंच इतर निकष तपशीलवार समजून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवरची माहिती वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

MPSC Steno Recruitment 2022 साठी महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 मे 2022

MPSC Recruitment 2022 साठी पदांचं विवरण

एकूण पदांची संख्या – 253

स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) – 62

स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) – 100

स्टेनो-टाइपिस्ट (मराठी) – 52

स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी) – 39

MPSC Recruitment 2022 साठी पात्रता निकष

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. टायपिंगचा स्पीड चांगला असायला हवा.

MPSC Recruitment 2022 साठी इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे.


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole