SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलमध्ये 7वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती, पगार 47000 पर्यंत

SRPF Recruitment 2022 : सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force, Dhule) धुळे येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. 

एकूण जागा : १९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) भोजन सेवक/ Food Servant १७
शैक्षणिक पात्रता : 
७ वी परीक्षा उत्तीर्ण.

२) सफाईगार/ Cleaner ०२
शैक्षणिक पात्रता :
 ७ वी परीक्षा उत्तीर्ण.

वयो मर्यादा : ०४ एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

आवश्यक कागदपत्रे :

पदाकरीता धारण करीत असलेली विहित अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला व पुढीलशिक्षणाचे (असल्यास) गुणपत्रक / प्रमाणपत्र.
जातीचे प्रमाणपत्र.
उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.)
जातीचे वैधता प्रमाणपत्र,
अनुसुचीत जाती, EWS व खुला या प्रवर्गातील उमेदवार वगळून नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र चालु वर्षाचे ग्राह्य धरण्यात येईल.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असलेबाबतचे प्रमाणपत्र.
शासकीय / निमशासकीय अथवा अन्य प्रकारच्या नोकरीत असलेल्या उमेदवारांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६, धुळे

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०४ एप्रिल २०२२ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtrasrpf.gov.in

परीक्षा दिनांक : __

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole