Government Jobs: राज्य सुरक्षा महामंडळात 25,000 रुपये पगाराची नोकरी; इथे लगेच करा अर्ज

MAHA Security Recruitment 2022 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई (Maharashtra State Security Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज (Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना लोकल भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

हे कम्युटर स्किल्स असणं आवश्यक

  • उमेदवारांकडे संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञानअसणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांकडे व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC) असणं आवश्यक आहे.
  • 30 w.p.m मराठी टायपिंग.
  • 40 w.p.m इंग्रजी टायपिंग.
  • शॉर्टहँड स्पीड 80 w.p.m (इंग्रजी आणि मराठी)
  • विशेषतः MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

MAHA Security Recruitment 2022 अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

[email protected]


सरकारी जॉब संधी –

2 Comments
  1. Sujata Rambhau Kakade says

    At. Chikhali, tal muktainagar

  2. Sushant says

    .

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole