नोकरीची सुवर्णसंधी! राज्याच्या CID विभागात ‘या’ पदासाठी होणार भरती; आज शेवटचा दिवस

Maha CID Pune Recruitment 2022 – गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (Criminal Investigation Department Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha CID Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी. या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती – विधी अधिकारी (Law Officer) – एकूण जागा 01

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विधी अधिकारी (Law Officer) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree of Lawपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांकडे बार काउन्सिल ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका अनुभव असणं आवश्यक

  • कायदा अधिकारी Gr-B पदासाठी 5 वर्षांचा कायदेशीर प्रॅक्टिस असलेल्या वकिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • उमेदवारांना कायदेशीर, फौजदारी, सेवा आणि प्रशासन, विभागीय चौकशी बाबी आणि त्यासंबंधीच्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे जेणेकरून ते कायदेशीर जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतील.
  • उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलणे, वाचन आणि लेखन कौशल्ये असणे आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

विधी अधिकारी (Law Officer) – 25,000/- रुपये प्रतिमहिना + 3,000/- (प्रवास आणि मोबाईल खर्च)

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – 411008.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole