ना क्लास , ना कुणाचं मार्गदर्शन…..२२ व्या वर्षी झाला IAS अधिकारी

IAS Varunraj – २० – २५ एक तर या मुलं- मुली कॉलेज संपत आलेलं असतं किंवा नुकतंच संपलेलं असतं. अजून व्यावहारिक जगाचा अनुभव घ्यायचा असतो. आणि त्याच जगात स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःला सिद्ध करायचं असतं. काहीतरी करून दाखवायचं असतं. नाव कमवायचं असतं…पण निम्म्याहून जास्त लोकांच्या बाबतीत असं होतं की हा विचार करून संपे पर्यंत आयुष्य पुढं निघून गेलेलं असतं… त्यात पुन्हा हे विचार मागे पडतात.

पण हे वय येण्याआधीच काही जणांनी ठरवलेलं असतं, आपल्याला काय करायचं आहे, आणि त्यानुसार योग्य वेळेत ठरवलेलं पार पाडून ते यशस्वी होतात, अशाच यशस्वी तरुणाची ही गोष्ट वाचूयात या लेखात….

भारतीय प्रशासकीय सेवेत वर्णी लागलेले अधिकारी अरुणराज (IAS Varunraj) हे उत्तरप्रदेशातील आहेत. दहावी असो की बारावी चांगले ९२ – ९४ % गुण मिळवलेला हा हुशार विद्यार्थी. याच हुशारीच्या जोरावर इंजिनीअरिंग ला प्रवेश मिळवला. आयआयटी कानपूर मधून (IIT Kanpur) अभियांत्रिकीची पदवी (Engineering) घेतली.


पण पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच UPSC चा अभ्यास सुरू केला. आयआयटी मध्ये इंजिनीअरिंग सोबतच UPSC चा अभ्यास करणं हे आव्हानच आहे. पण याचं ही अरुणराज यांनी योग्य नियोजन केलं. वेळेचं नीट विभाजन केलं आणि अभियांत्रिकी सोबतच हा ही अभ्यास केला. आधी पदवी पूर्ण करून घेतली. मग पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेला दिला. डोक्यात केवळ UPSC ठेवलं. नोकरीचा विचार ही बाजूलाच ठेवला.

कसं मिळवलं यश?

आता UPSC चा अभ्यास करायचा म्हंटल्यावर दिवसभर क्लास मग पुन्हा अभ्यास असं व्यस्त वेळापत्रक असतं. तसंच अरुण यांचं ही होतं, पण ते स्वअध्ययनाचं. विना क्लास त्यांनी हा स्वतःच अभ्यास केला. मार्गदर्शनाशिवाय हे यश मिळवल्यामुळे अरुण राज हे जास्त कौतुकास पात्र आहेत.

काय होती अभ्यासासाठीची रणनीती?

अरुण राज यांनी सांगितलं की जास्तीत जास्त भर त्यांनी NCERT च्या पुस्तकांवर दिला. यामुळे मूलभूत संकल्पना लवकर स्पष्ट होतात. आणि विषय सोपा होतो. अभ्यास नियमीतपणे व सतत करावा लागतो. पण सलग ८- ९ तास नाही. दीड ते दोन तास झाले थोडी विश्रांती घेऊन मग पुन्हा सुरू करायला हवं. म्हणजे आपला मेंदू ताजातवाना होतो. एकाग्रता होते. भरपूर संदर्भ पुस्तके वाचण्यापेक्षा ठराविकच पुस्तकांचा अभ्यास करावा. विषय समजून घ्यावा.

जास्त वेळ हा उजळणी त्याचबरोबर उत्तराच्या लिखाणाचा सराव व छोट्या छोट्या टॉपिक वर ही सराव चाचण्या सोडवण्यावर भर द्यायला हवा. आपण कायम आपलं मूल्यमापन करत राहायला हवं. या परीक्षेत यशस्वी परीक्षार्थी कोणता विषय पर्यायी म्हणून निवडतात, याकडे ही अभ्यास करणाऱ्या लोकांचं लक्ष असतं. तर अरुण राज यांनी मानववंश शास्त्र (Anthropology) हा विषय घेतला होता.

२०१४ ला अरुण यांचा नागरी सेवा परीक्षेचा (UPSC Civil Services) पहिलाच प्रयत्न होता. आणि याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवलं. देशस्तरावर त्यांनी ३४ वा क्रमांक मिळवला. वयाच्या २२ व्या वर्षी ते IAS Officer झाले. याबद्दल त्यांचं मार्गदर्शनही घ्यायला हवं व त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा.


हे ही वाचा –

3 Comments
  1. Vijay Gangadhar chivade says

    Congratulations sir agdi khup kmi vayat changli kamgiri Keli sir

  2. Vijay Gangadhar chivade says

    Congratulations sir agdi kmi vayat khup Yash milval

  3. Nivedita Mali says

    Congratulations respected sir
    Very good guidance

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole