कॉलेजात इंग्रजी बोलायला अडखळणारी ते पहिल्याच प्रयत्नात IAS झालेली सुरभी गौतम

मोठ्या शाळेत शिकलेले आणि उत्तम इंग्रजी बोलणारेच IAS होऊ शकतात हा समज एका हिंदी मिडीयम मध्ये शिकलेल्या IAS Surabhi Gautam हिने दूर केला. एका छोट्या खेड्यात शालेय शिक्षण घेतलेल्या सुरभीने UPSC सोबतच GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, Delhi Police, FCI ह्या सर्व परीक्षा देखील तिने उत्तीर्ण केल्या.

मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात राहणाऱ्या सुरभी गौतमचे वडील पेश्याने वकील तर आई शिक्षिका होती. खेडं असल्या कारणाने शाळेत मूलभूत सुविधांची कमतरता तर होतीच पण शिकवणारे शिक्षकही साधारणच होते. पण सुरभी मात्र लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. १० वी आणि १२ वी मध्ये तिने ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते.

१० वी पूर्ण झाल्यावरच तिने मोठं होऊन कलेक्टर होण्याचं स्वप्न बघितलेलं. १२वी नंतर इंजिनिअरिंगची इंट्रान्स एक्झाम देऊन तिथेही सुरभीने बाजी मारली. भोपाळमधील मोठया इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ह्या शाखेत ऍडमिशन घेतली.

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिला इंग्रजीमध्ये स्वतःचा परिचय देण्यास सांगितले परंतु इतरांप्रमाणे अस्खलित इंग्रजी बोलणे तिला जमले नाही. त्या दिवशी आपल्या रूम वर जाऊन ती खूप रडली आणि तिने आपल्या इंग्रजीवर काम करण्याचे ठरवले. पहिल्याच वर्षी तिने केवळ कॉलेजमध्ये नव्हे तर संपूर्ण विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला, सोबतच तिला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तिने भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर इथे न्यूक्लिअर सायण्टिस्ट म्हणून नोकरी करायला सुरवात केली. २०१३ साली सुरभीने IES (Indian Engineering Services) च्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला. एवढेच नव्हे तर GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, Delhi Police, FCI ह्या सर्व परीक्षा देखील तिने उत्तीर्ण केल्या.

२०१६ साली UPSC च्या परीक्षेत संपूर्ण देशात ५० वा क्रमांक मिळवून सुरभी IAS Surabhi Gautam झाली. तिच्या गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सुरभी गौतम एक आदर्श आहे.1 Comment
  1. […] इंग्रजी बोलायला अडखळणारी ते पहिल्याच… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.