भंगाराचा व्यवसाय करण्याचं स्वप्न बघणारा जेव्हा IAS अधिकारी होतो

IAS Deepak Rawat हे भारतातील सर्वात फेमस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या धडाडीने काम करण्याच्या पद्धतीचे अनेक लोक चाहते आहेत. म्हणूनच त्याच्या नावाने फेसबुकवर अनेक फॅन क्लब सुद्धा आहेत. युट्युबवर सुद्धा दीपक रावत यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

Deepak Rawat हे २००७ बॅचचे IAS अधिकारी आहेत. पोलिटिकल सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या रावत यांना UPSC ची तयारी करताना पहिल्या २ वेळेस अपयशाचा सामना करावा लागलेला. परंतु तिसऱ्या वेळेस त्यांनी IRS अधिकारी बनून दाखवले.

लहान असताना रावत यांना स्क्रॅपचा बिझनेस करायची इच्छा होती. वयाची २४ वर्ष पूर्ण झाल्यावर वडिलांनी त्यांना पैसे देणे सुद्धा बंद केलेलं आणि खडसावून सांगितलं कि स्वतः पैसे कमवा आणि खर्चाचं बघा. यांनतर त्यांनी दिलेल्या जेआरएफ परीक्षेचा निकाल लागला आणि त्यांना रु. ८००० स्कॉलरशिप मिळायला सुरवात झाली. पुढे त्यांनी दिल्लीला जाऊन UPSC ची तयारी करायला सुरवात केली.

पहिल्या २ वेळेस असफल झाल्यानंतर तिसऱ्या वेळेस मात्र त्यांची निवड झाली, मात्र गुण कमी असल्याने IRS साठी त्यांची निवड झाली. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि आपल्या ४ थ्या प्रयत्नात IAS होऊन दाखवले.

IAS Deepak Rawat यांच्या मुलाखतीचा सुद्धा एक फेमस किस्सा आहे. मुलाखत घेणाऱ्याने रावत यांना विचारले, “शून्य काय आहे ? शून्यापासून आपण काय शिकतो ?” त्यांनी उत्तर दिले,

  • शून्यापासून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. १ च्या पुढे शून्य लावला तर त्याची किंमत १० पटींनी वाढते, २ च्या पुढे लावला तर २० पटींनी.
  • याव्यतिरिक्त शून्य आपल्याला न्यूट्रल म्हणजेच तटस्थ राहायला शिकवतो. कारण एखादा अंक शुन्यासोबत जोडला तर त्याचे मूल्य वाढत नाही तर तसेच राहते. एखादा अंक शून्यामधून कमी केला तरीही त्याचे मूल्य तेवढेच राहते.
  • तसेच शून्य म्हणजे काहीच नाही. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे कि आपल्याला शून्याच्या खाली जायचे नाही.

दीपक रावत (IAS Deepak Rawat) यांनी उत्तराखंड आणि नैनिताल मध्ये केलेल्या कामांची लोक आजही तारीफ करतात. हरिद्वार मध्ये झालेल्या कुंभ मेळ्यातही त्यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. आपल्या कामाचे अनेक व्हिडीओ ते आपल्या युट्युब चॅनलवर टाकत असतात.



Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.