देश सेवेचा निर्णय घेऊन सोडले लाखोंचं पॅकेज, खडतर प्रवास करून झाली IAS अधिकारी

उत्तर प्रदेशच्या कानपुर (Kanpur, Uttar Pradesh) च्या रहिवासी असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी झालेल्या गुंजन सिंग (IAS Gunjan Singh Story). त्यांनी आपलं शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण हे कानपुरातच झालं. पुढे पदवीसाठी त्यांनी जेईई परीक्षा दिली (JEE). आणि खूप कष्ट घेऊन रुडकीच्या आयआयटी मध्ये (IIT Roorkee) मध्ये प्रवेश मिळवला.

आयआयटी मधून इंजिनिअर (Engineer) होऊन चांगल्या मोठ्या कंपनी मध्ये नोकरी करायची हे गुंजन यांच्या डोक्यात होतं. पण घडलं असं की काळ होता इंटर्नशीपचा, आसपास जो निमशहरी, ग्रामीण भाग होता, तिथं मुलांची जी परिस्थिती डोळ्यावर आली आणि जाणीव झाली यांच्यासाठी काहीतरी करण्यात यावं… आणि ध्येय ठेवलं द्यायची ती UPSC ची परीक्षा!.!

कशी झाली अधिकारी?

एकतर आयआयटी मधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यामुळे त्यांना मोठ्या आस्थापनात भरगच्च पगाराची नोकरी मिळाली होतीच. पण डोळयांसमोर फक्त सरकारी परीक्षाच होती.
संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC CSE Exam) ही खरंच कसोटी पहाते. पण गुंजन या परीक्षेत खऱ्या उतरल्या. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं..आणि गुंजन यांची भारतीय प्रशासकीय सेवेत वर्णी लागली.

अपयश पचवून यश मिळतं

अपयश पदरात पडल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही. गुंजन यांना दोन वेळेस अपयश पदरी पडलं होतं.. या अपयशामुळं खिन्नता येते, निराशा येते. गुंजन यांना कठीण काळातूनही जावं लागलं..यशस्वी होण्यापेक्षाही हा काळ जास्त अवघड असतो. यात पाठीवर हात हवा असतो. गुंजन यांच्या कुटुंबानं तोच हात त्यांच्या पाठीवर ठेवला. आणि गुंजन यांनी निराशा झटकली आणि पुन्हा जोमाने अभ्यास केला व देशभरात १६ वा क्रमांक (All India Rank) मिळवला.

IAS Gunjan Singh यांचा मोलाचा सल्ला

UPSC परीक्षा देताना योग्य नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. विषय व त्यांच्या अभ्यासक्रम भरपूर आहे. तो अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होतो. कारण अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच सरावासाठीही पुरेसा वेळ असणं आवश्यक आहे. आपण दर आठवड्याचं नियोजन करत प्रयत्न करत असल्याचं गुंजन यांनी सांगितलं. आणि या प्रक्रियेदरम्यान स्वतः मध्ये असलेल्या त्रुटीही शोधून त्या दूर करायला हव्यात, हे ही तितकंच महत्वपूर्ण आहे. कारण यामुळेच यशापर्यंत पोहोचणं अधिक सोपं होतं, असं गुंजन यांचं मत आहे.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole