संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद – United Nations Security Council (UNSC)
स्थापना – १९४५
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद रचना – १५ सदस्य (५ स्थायी + १० अस्थायी) अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र आम सभा करते. दरवर्षी पाच सदस्यांची निवड केली जाते.
अध्यक्ष – दर महिन्याला निवड (अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार)
स्थायी सदस्य – अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन
कोणत्याही प्रस्तावावर १५ पैकी ९ सदस्यांची संमती आवश्यक असते. कोणत्याही स्थायी सदस्याने नकार दिल्यास प्रस्ताव पास होत नाही.
जागतिक पातळीवर सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाल्यास सर्व प्रथम शांततामय तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र तो असफल झाल्यास पाच स्थायी सदस्यांद्वारा एकत्रितपणे सैनिकी कारवाई केली जाते.
संयुक्त राष्ट्रातील संविधान कलम २३ ते ३२ सुरक्षा परिषदेसंबंधी आहेत. कलम २४ सुरक्षा परिषदेचे कार्य (शांतता व सुरक्षा)