ACP Amar Mohite sir on Notes making for MPSC

While preparing for MPSC State exam Notes making is quite an important and complicated topic. Toppers believe making notes of mpsc material is very important but most of the students are not aware about ‘How to make notes’. Some students copy whole book under name of Mpsc notes making and some keep doing art in that. According to MPSC Toppers Note making is to use your most of the time in study and remembers you topics that are imp for the exam. Here is some Notes making tips for mpsc aspirants by ACP Amar Mohite sir (MPSC Cracked 2019)

खूप जण विचारतात की नोट्स काढाव्यात का? त्या बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, ACP Amar Mohite सांगत आहेत की नोट्स काढल्याचं पाहिजेत आणि त्या स्वतःच्या असल्या पाहिजेत. नोट्स काढण्यासाठी किंवा त्यात इतर माहिती add करण्यासाठी इतरांच्या व selected candidates च्या available नोट्स चा आधार घेऊ शकता.

1) नोट्स काढताना स्वतःच्या अक्षरात लिहून काढल्याने आपल्याला ते लवकर वाचता येते (असेही म्हणतात की एकदा लिहिणं हे दहा वेळा वाचण्याच्या बरोबर आहे!!)

2) नोट्स काढण्याआधी त्या विषयाचे किमान 3-4 वेळा व्यवस्थित (समजून घेऊन) वाचन झालेले असावे व जुन्या question papersचे व्यवस्थित analysis केलेले असावे म्हणजेच कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, त्या विषयात किती खोलवर जाऊन अभ्यास केला पाहिजे, factual येतात की theoretical येतात ही सर्व माहिती आपल्याला असली पाहिजे.

3) नोट्स किती लहान किंवा विस्तृत असाव्यात –
(*नोट्स खूप कमी शब्दात असल्या पाहिजेत..!) खूप जणांना पाहिले की ते नोट्स म्हणून अख्ख पुस्तकच पुन्हा लिहून काढतात. तसे केल्यास आपण आपला वेळ वाया घालवत आहोत. नोट्स आपण कमी वेळात जास्त रिविजन व्हावे यासाठी काढत आहोत हे सदैव लक्षात असू द्यावे. नोट्स किती मोठया असतील किंवा किती लहान असतील हे त्या विषयात किंवा त्या टॉपिक मध्ये किती facts आहेत, किती concepts आहेत, यावर अवलंबून असते.

4) नोट्स मध्ये चार्ट्सचा, diagram चा वापर केल्यास खूप कमी वेळात त्याची पुन्हा रिविजन होऊ शकते व आपल्याला आठवण्यासही सोपे जाते. (जसे की घटनात्मक आयोग व बिगर घटनात्मक आयोग यांच्या टेबल मध्ये नोट्स काढता येतात व एकाच वेळी comparison करून study करता येतो, त्यामुळे परीक्षेत होणारे confusion ही दूर होते)


5) आपल्याला अभ्यास लक्षात राहण्यासाठी काही मार्ग असतात जसे
i. खूप वेळा रिविजन
ii. नवीन संकल्पना किंवा अतिशय वेगळ्या व विचित्र गोष्टी
iii. पूर्वानुभवाशी गोष्टी लिंक करणे
यातील i) , ii ) साठी आपण नोट्स चा चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो.

6) नोट्स चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपण एकदा नोट्स काढल्या की त्या आपल्याला कायम साथ देतात, मुख्य परीक्षेच्या वेळी नोट्स मुळे खूप वेळ वाचतो.

7) नोट्स काढणं ही एक process आहे ती enjoy केली पाहिजे. ते burden समजून न करता अभ्यास करत करतच नोट्स काढल्या पाहिजेत, त्यासाठी टार्गेट ठेऊन काम करू नये(म्हणजे एका दिवसात इतका विषय नोट्स काढून संपलाच पाहिजे असा विचार करू नका कारण त्याच त्याच गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतात, त्यामुळे विषय संपवण्यापेक्षा विषय समजण्यावर अधिक भर दिला पाहिजे!!)

8) नोट्स आपल्याला स्पष्टपणे व लवकर वाचता येतील अश्याच काढाव्यात, जास्त सुंदर व आकर्षक बनवण्यासाठी वेळ घालवू नये, आपल्याला नोट्स ह्या दुसऱ्याला दाखवण्यासाठी किंवा पुस्तक प्रकाशित करण्यासाठी काढायच्या नसून परीक्षेसाठी काढायच्या आहेत हे कायम ध्यानात असू द्यावे.

9) आपल्याला अवघड वाटणारी, लक्षात राहणार नाही असे वाटणारी व वेगवेगळ्या स्रोतात विखुरलेली असणारी माहिती नोट्स मध्ये एकत्र करावी.

10) notes making साठी काही महत्वपूर्ण टिप्स असलेली रोमन सैनी सरांची व्हिडीओ-
https://youtu.be/Ek-IX6wtRrg

Amar Mohite Sir
(ACP/DySP 2019)


2 Comments
  1. Rohit Lende says

    Acp amar mohite sir ki instgram id konshi hai

    1. Namrata says

      I’d ky ahe sir tumchi telegram la

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole