पीएम कुसुम योजना

चर्चेत का आहे?

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM KUSUM) अंतर्गत ऑफ-ग्रीड सौर पंप बसवणारे हरियाणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

तसेच पीएम-कुसुम योजनेअंतर्गत शेती आधारित सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राजस्थानमधील भालोजी या गावात १ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प स्थापित करण्यात आला.

काय आहे योजना ?

PM KUSUM – Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyaan

सुरुवात – २०१९

मंत्रालय – केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

उद्दिष्ट – शेतकऱ्यांना आर्थिक आणि पाणी सुरक्षा प्रदान करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.

लक्ष्य २०२२ पर्यंत २५,७५० मेगावॅट सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडणे

एकूण केंद्रीय आर्थिक सहाय्य – ३४,४२२ कोटी रुपये.

योजनेचे घटक –

  • १०,००० मेगावॅट ओव्हरहेड विकेंद्रीकृत ग्रिडला अक्षय ऊर्जा संयंत्रांशी जोडणे. (संयंत्राचा आकार २ मेगावॅट पर्यंत)
  • १७.५० लाख सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप बसवणे. (पंप क्षमता ७.५ एचपी पर्यंत)
  • १० लाख ग्रिड जोडलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचे सोलरायझेशन. (पंप क्षमता ७.५ एचपी पर्यंत)

सर्व सरकारी योजना वाचण्यासाठी इथे क्लिक करा


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole