PM Kisan : या चुकांमुळे मोदी सरकारकडून मिळणाऱ्या 2000 रुपयांना मुकाल, तुम्ही अशा चुका करताय का?

केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली. खास करून अल्पभूधारक शेतकरी बांधवांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना बनवण्यात आली होती. या योजनेमुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे हा हेतू होता. तीच ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशातील बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. काही शेतकरी बंधूनी नोंदणीसाठी अर्ज भरले आहेत, पण त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचलाच नाही. काय अडचणी येत आहेत, ते जाणून घेऊयात

यांत जर नीट पाहिलं तर शेतकऱ्यांकडून  (Farmers) काही चुका होत आहेत त्यामुळे PM Kisan निधी मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही खरं तर लागू करून आता जवळपास अडीच वर्षे झाली. या योजनेद्वारे शेतीचं सामान उदा. बियाणं, औषधं, खतं इ. खरेदी करण्यासाठी हातभार लागेल. सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० ₹ देत आहे. हे पैसे दर वर्षी तीन टप्प्यात दिले जातात. एका वेळी शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खात्यात वर्षातून तीन वेळा २००० ₹ जमा होतात. नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच हा निधी मिळतो, म्हणून नोंदणी करणं गरजेचं आहे. त्याच बरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं गेलं पाहिजे.

असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांना या योजनेबद्दल फारशी माहिती नाही. किंवा त्यांना नोंदणी कशी करावी याबद्दल काही कल्पना नाही. बर ज्यांनी नोंदणी केली आहे, ती करताना जो फॉर्म भरला आहे. तो सदोष असल्यामुळे हा निधी खात्यात जमा करण्यात अडचणी येत आहेत.
छोट्या छोट्या चुका हे फॉर्म भरताना झाल्याचं दिसून येत आहेत.

वाचा काय आहेत चुका

-शेतकऱ्यांना नाव इंग्रजीमध्ये लिहिणं आवश्यक आहे, तुम्ही इतर भाषेत नाव लिहिलं असेल तर ते बदलणं गरजेचं आहे.

-शेतकऱ्याचं खातं आणि अर्जावरील नावात कोणतीही स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये

-बँकेचा IFSC कोड लिहण्यासाठी कोणतीही चूक करू नका

-बँक खात्याची माहिती देतानाही कोणतीही चूक करू नका

-तुमचा पत्ता, गावाच्या नावाची स्पेलिंग देखील योग्यपणे तपासा

PM Kisan ऑनलाइन कशाप्रकारे सुधाराल चुका?

ज्या चुका आधी झालेल्या आहेत, त्या सुधारण्यासाठी आधी pmkisan.gov.in या PM Kisan वेबसाईटवर जा. त्या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नरवर जा. त्या वर क्लीक केल्यावर एक लिंक असते जीच्या वर आधारची योग्य माहिती भरता येईल. योग्य आधार क्रमांक भरता किंवा तपासता येईल, चुकीचा खातेक्रमांक बदलून योग्य क्रमांक टाकू शकतो.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole