ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय करायला पाहिजे ? तक्रार कशी आणि कुठे करावी ?

मागील काही वर्षांपासून सरकारने भारतीय जनतेला डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहित केलं आहे. नोटबंदी आणि कोरोना मुळे भारतात डिजीटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु जेवढ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार वाढलेत तेवढेच ऑनलाईन फसवुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.

आपण केलेल्या काही छोट्या चुका किंवा केलेल्या हलगर्जीपणामुळे सायबर फ्रॉडच्या घटना घडतात. परंतु वेळीच योग्य पावले उचलली तर तुमच्या अकाउंट मधून चोरी गेलेले पेसे तुम्हाला परत मिळू शकतात. छोटी रक्कम आहे म्हणून जाऊदे म्हणत हलगर्जी न करता योग्य प्रकारे तक्रार करणं गरजेचे आहे.

जर तुमची ऑनलाईन फसवणूक होऊन खात्यातील पैसे चोरीला गेले असतील तर ३ दिवसांच्या आत त्या घटनेची तक्रार करणं गरजेचं असतं. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटला सुद्धा तक्रार नोंदवू शकता.

ऑनलाईन फ्रॉड झाल्या झाल्या लगेच बँकेत कळवलं तर तुमच्या अकाउंटचे सर्व व्यवहार बंद करून मोठं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता. तसेच नियमांनुसार १० दिवसांत तुम्हाला रिफंड मिळण्याची शक्यता देखील असते.

सायबर फ्रॉड झाल्यास लोकांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 155260 सुरु केला आहे. हि हेल्पलाईन सध्या काही ठराविक राज्यातच सुरु आहे परंतु लवकरच इतर राज्यांमध्येही ती सुरु होईल.

झालेल्या फ्रॉडची तक्रार करताना सर्व तपशील जसेकी आलेला ईमेल, मेसेज किंवा इतर कुठलीही माहिती पोलिसांना सविस्तर सांगा. हलगर्जी न करता वेळीच योग्य पावलं उचलली तर तुमचं मोठं नुकसान होण्यापासून थांबवता येऊ शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole