बेरोजगार असाल तर प्रॉव्हिडंट फंडातून अ‍ॅडव्हान्स घेण्याची सुविधा

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अनेकांचे पगार कमी झाले आहेत त्यामुळे बेरोजगार होण्याची वेळ आली आहे, अशावेळी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं (EPFO) आपल्या सदस्यांना मदतीचा हात दिला आहे.

कोरोना महासाथीमुळे २०२०-२१ खूपच वाईट दिवस दाखवत आहे. नीट, सुरळीत चाललेलं आयुष्य एकदमच बदलून जातं. या कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी करावी लागली होती. आपल्याला माहीत आहे की या टाळेबंदीमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते, कंपन्याही बंद होत्या. ज्याचं  काम घरून चालू होतं त्यांचं नीट असेल पण ज्यांना कामासाठी घराबाहेर पडावं लागतं त्यांची परिस्थिती बिकट होती. याच दरम्यान बऱ्याच कंपन्यांनी टाळेबंदीची सबब सांगून कामगार कमी केले आहेत. बऱ्याच लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पण अशा परिस्थितीतही आशेचा एक किरण आहे. अशाप्रकारे होईल आर्थिक विवंचनेतून सुटका, जाणून घ्या.

ज्या व्यक्तींची नोकरी गेली आहे, अशांना केंद्र सरकारची एक योजना फायदेशीर ठरू शकते. तिचं नाव आहे राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना ( RGSKY- Rajeev Gandhi Shramik Kalyan Yojana). ही योजना २००५ मध्ये सुरू झाली. या योजनेद्वारे बेरोजगारी भत्ता देण्यात येतो. पण यासाठी व्यक्ती (ESIC- Employee State Insurance Corporation) कर्मचारी राज्य विमा निगमच्या योजनेअंर्तगत नोंदणीकृत असायला हवी. व्यक्तीच्या उत्पन्नाच्या ५०% रक्कम भत्त्याच्या स्वरूपात मदत म्हणून मिळते. नोकरी गेल्यावर पुढील दोन वर्षे ही मदत मिळू शकते. ESIC या योजनेअंतर्गत ही राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना राबवली जाते. आणि ही ESIC ही योजना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयातर्फे आणली गेली आहे.

जर कंपनीने एकच वेळी बरीच माणसे नोकरीवरून कमी करण्यात आली असतील किंवा काही तांत्रिक कारणांमुळे जर का कंपनी बंद झाली असेल तर ESIC मध्ये नोंदणीकृत व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेसाठी ESIC च्या कार्यालयातच अर्ज करावा लागतो. या अर्जाची तपासणी केली जाते. नियामक संघटनेच्या मान्यतेची मोहोर उमटवली जाते मग व्यक्तीला ही रक्कम मिळते.

म्हणून जरी दुर्दैवाने नोकरी गेली असेल तरी आपलं आयुष्य तणावपूर्ण न बनवता या योजनेचा लाभ घ्यावा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole