PAN Card हरवलंय? या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस

आपली ओळख करून देण्यासाठी आपण आधार कार्डाची मदत घेतो. सर्व ठिकाणी आपलं ओळखपत्र हे आधारकार्ड झालं आहे. म्हणजे ‘आधारकार्ड’ (AADHAR CARD) हे आपल्या ओळख पटवण्याचा आधार आहे. त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे तो म्हणजे पॅन कार्ड. (Pan card) तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करावयाचे झाल्यास तुमचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी असलेलं कुलूप उघडणार नाही. त्यामुळे ही सगळी कागदपत्र नीट जपणं आवश्यक असतं.

पण काही गडबडीमुळे तुमचं पॅन कार्ड हरवलं तर…?? तर घाबरू नका आपल्याकडे आहेत हे पर्याय. जाणून घेऊयात –

पुन्हा नव्याने पॅनकार्ड मिळवण्यासाठी आपण ऑनलाईन (Offline) आयटी पॅन सेवा केंद्र, टीआयएन सुविधा केंद्र इथे अर्ज करू शकता.

www.utiitsl.com, www.incometaxindia.gov.in, www.tin-nsdl.com ही आयकर विभागाची अधिकृत संकेतस्थळे (Websites) आहेत. यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो व पॅन कार्डची (pan card online) नवीन प्रत मिळू शकते. या पद्धतीने Pan card download अगदी काही मिनिटात होईल.

आपलं सगळं जग ही जलद झालं आहे कारण सगळी कामं ही आता ऑनलाईन (Online) होत असतात. म्हणून ऑनलाईन पद्धतीने आपण हरवलेलं पॅन कार्डही मिळवू शकतो.

NSDL e-government हा ई पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतो. https://www.tin-nsdl.com/ या आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करू शकतो.

या संकेतस्थळावर जाऊन ‘Reprint of Pan card’ हा पर्याय निवडायचा असतो. त्यांनतर आपली सर्व माहिती तिथे भरावी लागेल. यानंतर आपल्याला पॅन कार्ड क्लीक करण्याची पुष्टी करण्यासाठी विचारलं जाईल. त्यातील होय या पर्यायावर क्लीक करावं. यानंतर आपल्याला OTP पाठवण्याबाबत विचारणा केली जाईल, यासाठी आपला अधिकृत मोबाईल क्रमांक चालू असायला हवा. हा OTP आपल्या मोबाईल व ई-मेल वर येतो. हा OTP अपेक्षित जागी भरल्यावर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तयार आहे, असे दिसेल. आता आपला हे E Pan Card डाऊनलोड करण्याचा मार्ग मोकळा आहे.

आम्हाला आशा आहे की वरील माहिती ही आपलं टेन्शन नक्कीच कमी करेल व आपल्याला उपयुक्तच ठरेल.


3 Comments
  1. Lokesh yevale says

    Pan card new

  2. Lokesh yevale says

    New PANCARd plz maz PANCARd hrvly

  3. Ajay santosh kakde says

    Pancard new

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.