राष्ट्रीय आयुष मिशन

राष्ट्रीय आयुष मिशन चर्चेत का आहे?

देशातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांवर होणारा भार कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय आयुष मिशनला (national ayush mission) केंद्रीय पुरस्कृत योजना म्हणून मार्च २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली.

या प्रकल्पासाठी एकूण ४६०३ कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी ३००० कोटी रुपये केंद्राचा वाटा, तर उर्वरित राज्य’ सरकारांचा वाटा असणार आहे.

काय आहे आयुष मिशन?

राष्ट्रीय आयुष मिशन सप्टेंबर २०१४ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आयुष विभागाद्वारे १२व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरु करण्यात आले.राष्ट्रीय आयुष मिशनहे मिशन सप्टेंबर २०१४ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आयुष विभागाद्वारे १२व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरु करण्यात आले.

भारतीयांच्या एकूण आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष क्षेत्राचा विस्तार या योजनेत समाविष्ट आहे.

मिशनचे अनिवार्य घटक –

१) आयुष सेवा
२) आयुष शैक्षणिक संस्था
३) औषधी वनस्पती
४) आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी औषधांचे गुणवत्ता नियंत्रण


सर्व सरकारी योजना वाचण्यासाठी इथे क्लिक करा


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole