महाराष्ट्र राज्य महिला आयोग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग (Maharashtra State Commission for Woman) हे एक वैधानिक मंडळ असून या आयोगाची स्थापना १९९३ साली झाली आहे.
आयोगाची प्रमुख उद्दिष्टे –
महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे.
महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे.
महिलांवर परिणाम करणाऱ्या कायदयांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्या संबंधित सर्व मुद्द्यावर शासनाला सल्ला देणे.
गरजू महिलांना समुपदेशन आणि निःशुल्क कायदेशीर सल्ला देणे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग ची विभागीय कार्यालये
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनी (८ मार्च) कार्यान्वित झाली.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहेत.
या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील समस्या घेऊन येणाऱ्या महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन केले जाईल, किंवा स्थानिक पोलिस ठाण्यातून सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगाने स्वाधिकारे (suo moto) दखल घेण्यासारख्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
रूपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग च्या अध्यक्षा
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली निलेश चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी २० ऑक्टोबर २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली.
त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. भाजपच्या विजया रहाटकर यांच्या राजीनाम्यानंतर गेली दीड वर्षे आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.