शेवटी IPS होऊनच दाखवलं…३५ वेळा यशाने दिली हुलकावणी…

मोठ्या उत्साहाने प्रेरणा घेऊन बरेच विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतात. पदवी पूर्ण होण्याआधी पासूनच किंवा पदवी हातात घेऊन त्यांनी हा अभ्यास सुरू केलेला असतो. पण पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि मग मुलाखती पर्यंत येताना किती टक्के उमेदवार पोहोचतात, हे सर्व लोकांना आता माहीत आहे.

इथे यशस्वितांची टक्केवारी कमी आहे. अपयश मिळालं तरी हे लोक पुन्हा प्रयत्न करतात. पण यातले बरेचसे उमेदवार तिसऱ्या किंवा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या पर्यायांना हात घालतात. आपली वेगळी वाट धरतात. पण जे नेटाने प्रयत्न करतात. शेवटी यश हे त्यांच्याकडे येतंच. अशाच अतोनात कष्ट करून (Success story of IPS Officer) यशस्वी IPS Vijay Vardhan यांची ही गोष्ट.

हरियाणामध्ये सिरसा (Sirsa, Haryana) नावाचा जिल्हा आहे. या सिरसा मध्ये राहणाऱ्या विजय वर्धन (IPS Vijay Vardhan) यांनी सरकारी अधिकारी व्हायचं ठरवलं होतं. त्यासाठी विविध जागांसाठी ३० सरकारी परीक्षा दिल्या. कोणत्याच परीक्षेत यश आले नाही. त्याच बरोबर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC CSE Exam) नागरी सेवा परीक्षा दिल्या. ५ वेळा प्रयत्न केले परंतु तिथे त्यांना अपयशच पदरी आलं. पण जो व्यक्ती जिद्दी असतो. तो हार नाही मानत. विजय यांच्याकडेही हाच गुण आहे. म्हणून त्यांनी अजून जोर लावला आणि ६ व्या प्रयत्नात त्यांनी दमदार यश मिळवलं.

IPS Vijay Vardhan यांचे शिक्षण

सिरसा मध्येच विजय यांनी शाळेचं शिक्षण घेतलं. पुढे पदवी साठी ते हिसारमध्ये गेले. तिथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये अभियांत्रिकीची पदवी (Electronics Engineering) घेतली. पदवीनंतर सरकारी नोकरी साठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. तयारी करण्यासाठी जे पोषक वातावरण लागतं, म्हणून जवळ असणारं महत्वाचं शहर म्हणजे दिल्ली. दिल्लीला UPSC चे कोचिंग क्लासेस खूप आहेत. अशाच एका क्लास मधून त्यांनी तयारी केली.

UPSC द्वारे सरकारी नोकरी मिळवणं, हे खूप अवघड आहे. त्याचबरोबर अन्य परीक्षांची तयारी आणि त्यांनाही सामोरं जाणं हा पर्याय बहुतेक उमेदवार निवडतातच त्याचप्रमाणे विजय यांनीही SSC CGL, हरियाणा लोकसेवा आयोग (HPCS), उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UP PCS), यासारख्या खूप परीक्षा दिल्या. पण काहीच हाती लागलं नव्हतं.

यशाचा मार्ग –

विजय हे दिल्लीला CSE च्या तयारीसाठीच राहिले होते. त्यांनी २०१४ पासून UPSC ची परीक्षा पहिल्यांदा दिली. पहिल्या दोन प्रयत्नात त्यांनी पूर्व परीक्षा देऊन ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. पण तिथून पुढे नाही जाऊ शकले. आता तिसऱ्या वेळी त्यांनी तयारी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली पण अजूनही कुठंतरी कमी राहत होती. त्यांनी खचून न जाता हार न मानता सतत प्रयत्न चालू ठेवले. आधी झालेल्या चुकांवर लक्ष केंद्रित केलं, त्या सुधारल्या. आणि यश मिळवलं.

त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सतत आपली मानसिकता तीच ठेवणं. अपयशाच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुनःपुन्हा उभं राहणं…अथक प्रयत्न करून यश खेचून आणणं. ही विजय वर्धन यांची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.


हे ही वाचा –

1 Comment
  1. Aakash mhaske says

    अशीच प्रेरणादायी माहिती आमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ❤️

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole