भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 150 जागांसाठी भरतीची घोषणा

IB ACIO Recruitment 2022 – भारतीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IB ACIO Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade 2/Technical) – एकूण जागा 150

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade 2/Technical) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B Tech/B Sc किंवा M Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना शिक्षणादरम्यान 60% aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे GATE-2020 or GATE-2021 or GATE-2022 चा संबंधित ब्रांचमधील valid स्कोर असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

  • खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये
  • मागासवर्गासाठी – शुल्क नाही

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2022


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole