अभ्यास करताना इंटरनेटचा वापर कसा करावा ? टॉपर वापरतात या स्मार्ट ट्रिक

सध्या कोणतीही गोष्ट अडली की त्याचे उत्तर इंटरनेटवर मिळेल, असे सरसकट मानले जाते. मग त्याला स्पर्धा परीक्षा तरी अपवाद कशी असेल? मात्र प्रत्येक वेळी सांगितले जाते त्याप्रमाणे आवश्यक तितकाच इंटरनेटचा वापर केला पाहिजे हे जितके खरे तितकेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना विश्वासार्हता या निकषाला प्राधान्य दिले पाहिजे.

तंत्रज्ञानाचा बोलबाला असताना विद्यार्थी त्यापासून फटकून वागू शकत नाहीत, हे खरे असले तरीही स्पर्धा परीक्षांसारख्या परीक्षांमध्ये मिळालेल्या माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची कारण शेवटी त्याचे रूपांतर मार्कांमध्ये होणार असते. तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात इंटरनेटची मदत कशी आणि किती घेता येईल त्याचा विचार या लेखात करूया.

हा माहिती देणारा लेखही इंटरनेटच्या मदतीने वाचत आहातच त्यामुळे इंटरनेटचा वापर राज्यसेवा परीक्षांसाठी याचा वापर करताना इंटरनेटवर अनेक अभ्यासाचे, माहितीचे व्हिडिओ दिसतात. त्याशिवाय काही सरकारी संकेतस्थळे अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतो.एक महत्त्वाची आणि परत परत लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा मर्यादित गरजेपुरताच वापर करणे.

इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे म्हणूनच त्याच्यात गुरफटून जाऊन अनावश्यक माहिती वाचण्यात वेळ वाया जाऊच शकतो, हे टाळले पाहिजे. राज्यसेवेचा अभ्यास करताना अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, त्यात सतत नवीन माहिती अपडेट होऊन पुस्तके येतात. काही माहितीत बदल होणार नसतो. हल्ली इंटरनेट हाताशी आल्याने सतत वाचलेली माहिती इंटरनेटवर शोधून ती बरोबर आहे ना हे शोधण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये विनाकारणच निर्माण झालेली आहे.

पण या सर्वात वेळ वाया जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र विद्यार्थ्यांनी पुस्तकांवर विश्वास ठेवला पाहिजे. ज्या विषयांबाबत कमी माहिती असेल त्यासाठी आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असलेली पुस्तके वापरू शकता.

या सर्वांमधून पुरेशी माहिती मिळणार असेल तर इंटरनेटचा वापर टाळा कारण त्यामुळे वेळ वाचणार आहे. एखाद्या माहितीसाठी पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, ती योग्य विश्वासार्ह संकेतस्थळावरून मिळवू शकता. तेवढ्यासाठीच इंटरने वापरा.

इंटरनेट वापरताना –

एखादी माहिती शोधताना नेमके कोणते मुद्दे शोधायचे आहेत ते नोंदवा. शासकीय संकेतस्थळांवर ती माहिती मिळते का ते पहा. माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नोटस् काढा जेणेकरून पुन्हा पुन्हा इंटरनेटचा वापर करावा लागणार नाही. काही सरकारी वेबसाईट आहेत त्या खाली दिल्या आहेत. त्यांचा संदर्भासाठी वापर करू शकता.

सर्व मंत्रालयांच्या स्वतंत्र वेबसाईटस्

  • विकीपिडीया
  • विकासपिडीया
  • पीआयबी- pib.nic.in
  • Prsindia
  • Mrunal.org
  • एमपीसीच्या परीक्षांचे अपडेट देणाऱ्या साईटस् उदा. MPSC360.com

या व्यतिरिक्त युट्युब वर अनेक व्हिडिओज आहेत त्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचे व्हिडिओज टाकतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यात नोटस काढण्याचे, अभ्यासाचे मार्गदर्शन मिळू शकते.

राज्याचा, देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठीही काही व्हिडिओज इंटरनेटवर मिळू शकतात. उदा- प्रधानमंत्री सिरीज. तर राज्यघटना या सिरीजमध्ये राज्यघटनेविषयी माहिती मिळते. त्याशिवाय करंट अफेअर्सचा अभ्यास करण्यासाठी काही व्हिडिओ मिळू शकतात.

राज्यसेवा परीक्षेत इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो, मात्र गरज असेल तेव्हा आणि मर्यादित वापर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरता कामा नये.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole