भारतीय निवडणूक आयोग

स्थापना – भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच Election Commission of India ची स्थापना २५ जानेवारी १९५० (२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो.)

मुख्यालय – नवी दिल्ली

मुख्य निवडणूक आयुक्त – सुशील चंद्रा

इतर निवडणूक आयुक्त – राजीव कुमार, अनुप चंद्र पांडे

देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला हा घटनात्मक आयोग आहे.

राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार, देशातील निवडणुकीसंबंधित देखरेख आणि नियंत्रणाचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतील. अशा प्रकारे, निवडणूक आयोग ही एक अखिल भारतीय संस्था आहे कारण ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांसाठी समान आहे.

आयोग पुढील निवडणुकांचे व्यवस्थापन करते –

१) लोकसभा
२) राज्यसभा
३) राज्य विधानसभा
४) राज्य विधान परिषद्
५) राष्ट्रपती
६) उपराष्ट्रपती

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त सहसा सेवानिवृत्त IAS अधिकारी असतात. त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बरोबरीने वेतन आणि भत्ते मिळतात.

१९५० पासून १९८९ पर्यंत एक सदस्यीय आयोग होता. १६ ऑक्टोबर १९८९ रोजी पहिल्यांदाच आयोगावर दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली.

यापूर्वीचे मुख्य निवडणूक आयुक्त –

  • पहिले – सुकुमार सेन १९५०-५८
  • महिला – व्ही. एस. रमादेवी १९९० (एकमेव महिला)
  • २० वे – नसीम झैदी २०१५-१७
  • २१ वे – ए. के. ज्योती २०१७-१८
  • २२ वे – ओ. पी. रावत जाने. – डिसें. २०१८
  • २३ वे – सुनील अरोरा २०१८-२१

सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुशील चंद्रा यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नेमणूक केली.

१३ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला असून ते देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत.

सुनील अरोरा यांची त्यांनी जागा घेतली. त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

ते १८ फेब्रुवारी २०२० पासून सीमांकन आयोगाचे (Delimitation Commission) सदस्य देखील आहेत.

अल्पपरिचय:

भारतीय महसूल सेवेच्या १९८० च्या तुकडीचे अधिकारी. (आयकर केडर)

१९८० पूर्वी ते भारतीय अभियांत्रिकी सेवेत कार्यरत होते.

२०१६-१९ – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष म्हणून नेमणूक

अनुप चंद्र पांडे –

उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पांडे हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्यांना कार्यकाळ मिळणार आहे.

पांडे यांनी जून २०१८ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून काम केले होते.

पांडे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, एमबीए आणि प्राचीन इतिहासातील डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole