झटपट श्रीमंत बनवणारी क्रिप्टोकरन्सी का आहे वादग्रस्त; भारतात काय आहेत नियम

Cryptocurrency meaning in marathi हो. योग्य वाचलात. सध्या अनेक मराठी लोक अश्याप्रकारे गुगलवर सर्च करत आहेत आणि हा ट्रेंड होत आहे कारण लोकांना Cryptocurrency बद्दल कुतुहूल निर्माण झालाय. आजचा लेख हा Cryptocurrency बाबत –

२०१६ च्या नोटबंदी नंतर देशाने रोकड विरहीत होण्याकडे जोरदार पावलं टाकायला सुरुवात केली. याआधी आपण फोनवरून असे पैशांची देवाण घेवाण करू शकू असा विचारही केला नसेल. याआधी आपण मनीऑर्डर नंतर थेट बँकेत जाऊन रक्कम भरणे अशा पद्धतीने पैसे पाठवायचो. आता काळ बदलल्यामुळे ते म्हणतात ना “पेटीएम करो” आणि आपण पेटीएम, फोन पे (Paytm, Phonepe) करत सुटतो. पैशांची देवाण घेवाण, गुंतवणे यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रितीचे असे पुढील मार्ग आहेत, विविध मोबाईल अँप्स, बँक, पोस्ट यांच्या योजना, शेअरमार्केट, म्युच्युअल फंड्स असे विविध पर्याय त्यासाठी आहेत. अजून एक पर्याय आहे, (cryptocurrency in Marathi) त्याबद्दलच आपण जाणून घेऊया,

काय आहे क्रिप्टोकरन्सी? | What is Cryptocurrency ?

आता जाणून घेऊया cryptocurrency meaning in marathi – कोणत्याही प्रदेशात बाजारपेठ चलीत स्वरूपात असेल तर ते गाव, राज्य, देश चलीत असतो पण त्याला चालवायला चलन लागते. प्रत्येक देशाचे आपापले एक चलन आहे. उदा. डॉलर हे अमेरिकेचे, पौंड हे ब्रिटनचे, युरो युरोपिअन महासंघाचे, तर रुपया हे भारताचे चलन आहे. हे चलन प्रत्येक देशाने प्रत्यक्ष रुपात आणलेले असते म्हणजे त्या चलनाच्या विविध किंमतीच्या नोटा छापल्या व नाणी पाडली जातात. ते असूनही आपण या चलनाची डिजिटल म्हणजे एक प्रकारे आभासी स्वरूपात देवाण घेवाण करत असतो. तसंच जे आभासी प्रकाराचं चलन आहे. त्याला क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणतात. कारण वरील भौतिक चलनांप्रमाणे ते छापलेलं नसतं. हे क्रिप्टो करन्सी कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही. पण याद्वारे व्यवहार होऊ शकतात. म्हणून हे वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

इतिहास काय आहे? | Cryptocurrency meaning in marathi

जगात हे पाहिलं आभासी चलन आलं त्याचं नाव आहे बिटकॉईन (Bitcoin), त्याची सुरुवात २००९ मध्ये जपानच्या पेशाने अभियंता असणाऱ्या सातोशी नाकामोटो यांनी केली. हे संगणकीय प्रोग्रामिंग C++ च्या मदतीने बनवलेले चलन आहे. जरी हे चलन सातोशी नाकामोतो यांनी बनवले असले तरीही याचा कुणी मालक नाही. बरं आजवर सातोशी नाकामोतो जगासमोर आलेले नाहीत. बिटकॉईन हा मुक्त स्रोत आहे. बिटकॉईनची नाणे मर्यादा ही २१ दशलक्ष आहे. बिटकॉईन ‘SHA-२५६’ या अल्गोरिदमनुसार काम करते.
हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. यानंतर तयार झालेल्या आभासी चलनांची यादी मोठी आहे. मग आलं लिटकॉइन. २०११ मध्ये याची निर्मिती करण्यात आली. चार्ली ली या व्यक्ती हे लिटकॉइन तयार केलं. चार्ली ली हा गुगलचा कर्मचारी आहे. लिटकॉईनची खासियत ही आहे की त्याच्यावर फारच वेगवान व्यवहार होतो. त्याची नाणे मर्यादा ही ८४ दशलक्ष आहे. ते स्क्रिप्ट या अल्गोरिदमनुसार काम करते. यानंतर २०१२ मध्ये रिपल या आभासी चलनाची निर्मिती करण्यात आली. कोणतेही चलन रिपलमध्ये रूपांतरित होऊ शकते. रिपल हे पेमेन्ट नेटवर्क ही आहे. २०१५ मध्ये अजून आभासी चलन आलं त्याचं नाव आहे, एथेरियम. याचे मूळ ‘एथेर’ आहे, (ETH). तसेच अन्य म्हणजे बिटकॉईन कॅश, झकॅश, मोनेरो, स्टेलर इ. अशा बऱ्याच क्रिप्टोकरन्सी आहेत. सध्या फेसबुकची एक क्रिप्टो करन्सी रांगेत आहे. तिचं नाव लिब्रा आहे.

कामकाज कसं चालतं?

आपण रोज जे रोखीचे, चेक, आता कॅशलेस हे सगळे व्यवहार करतो, त्यांवर बँकांचं नियंत्रण असतं. तसं खरं तर अशा कोणत्या संस्थेचं या क्रिप्टो चलनावर नियंत्रण नसतं. याचे सगळे व्यवहार, कामकाज सॉफ्टवेअरमार्फत होतात म्हणून ही डिजिटल मालमत्ता आहे. वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी या चलनाचा उपयोग होतो. देश-विदेशांतील वेगवेगळ्या अधिकृत चलनांचा अडथळा येण्याचा प्रश्नच नाही. या डिजिटल मार्गाला सुरळीत ठेवण्याचं जे तंत्रज्ञान आहे. त्याला ब्लॉक चेन तंत्रज्ञान (Block Chain technology) म्हणतात. काय असतं नक्की हे ब्लॉक चेन तंत्रज्ञान. ज्या बँकेद्वारे आपण आपले व्यवहार करतो तर त्या संबंधित बँकेचे संगणक आपल्या खात्यासंबंधी माहिती ठेवतात. आणि त्या बॅन्कांच्या एखाद्या मुख्य संगणकावर ही सगळी माहिती साठवलेली असते. क्रिप्टोकरन्सीचं ही सगळं कामकाज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत असल्यामुळे हे जगभरातले भरपूर संगणक यांत सहभागी असतात आणि या आभासी व्यवहारांच्या नोंदी जगभरातल्या संगणकात होत असतात. म्हणजेच माहिती विकेंद्रित होत राहते. हेच ब्लॉक चेन आहे. याच्या व्यवहाराच्या मूळ माहितीत फेरफार होण्याची शक्यता खूपच कमी असते. यांत तेवढीच गुप्तता पाळली जाते. या खास तंत्रज्ञानामुळे या व्यवहारांची विश्वसनीयता व सुरक्षितता वाढते.

क्रिप्टोकरन्सी आणि भारत | cryptocurrency in india

आपल्या देशाचा विचार केला तर या क्रिप्टोकरन्सीच्या फंदात आपल्या देशात ७० लाखांहून अधिक लोक पडले आहेत. आणि जवळपास १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक या आभासी चलनाच्या बाजारपेठेत केली आहे.
भारतीयांची या आभासी चलनातली रुची अजून वाढत चालली आहे. हे पाहता आपल्या इथल्या गुंतवणूकदारांची इच्छा होती की आता आपल्या हक्काची अशी करन्सी असायला हवी. त्याप्रमाणे इंडीकॉइनची कल्पना पुढे आली आहे. यासाठी लागणारं ब्लॉक चेन सारखं तंत्रज्ञानही आपणच इथेच भारतात विकसित करावं. पण त्याचबरोबर गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं हित जपलं जावं यासाठी या नियंत्रण ठरणारी कायद्याची चौकट असावी अशा आशयाची मागणी पुढे येत आहे. यासाठी डिजिटल आणि क्रिप्टो यातला फरक निश्चित करावा लागेल.भारतात क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार बेकायदेशीर नाही पण कायदेशीर नियंत्रण मिळवण्याठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. २०१८ मध्ये RBI ने क्रिप्टो करन्सीवर निर्बंध आणले होते. पण दोन वर्षांनी हे निर्बंध उठवले गेले. सरकार यासाठी एक खास विधेयक सुरू करणार असल्याचं म्हणलं जात आहे. त्याचं नाव क्रिप्टोकरंसी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करंसी बिल 2021 असं असणार आहे.

फायदे-तोटे काय आहेत?

सर्वसाधारण डिजिटल व्यवहारापेक्षा ही पद्धत सुरक्षित आहे. याच्या व्यवहारासाठी कमी शुल्क लावले जाते. ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे फसगत होण्याचं फारच कमी आहे. यामध्ये कुणाचेही नियंत्रण नाही म्हणून याचे खास नियम नाहीत, दोन अकाऊंटमध्ये व्यवहार होतो, मध्यस्थही कोणी नसतो. ही बाजारपेठ अखंडीत सुरू आहे. यांमध्ये होणारे व्यवहार व त्यांचा वेग जलद आहे.
जर यांत काही अपहार किंवा बनाव झाला तर यात कुठल्या अधिकृत संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे कुणाकडे दाद मागणार याची काही व्यवस्था नाही. क्रिप्टोकरन्सी स्थिर नाही, यांत रोज बदल होत असतो. त्यामुळे नफा कधी तोटा होऊ शकतो. क्रिप्टोकरन्सी सुरू करणं सोपं आहे पण त्याचं कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवणे हे मोठं आव्हान असतं. यांत केलेले व्यवहार परत फिरवणे हा प्रकार असत नाही. हे कोणत्याही नियंत्रणात नाही म्हणजे कोणतेही ठराविक अटी व नियम नाहीत, त्यामुळे लुबाडणूक होऊ शकते. यांत मध्यस्थ किंवा नियंत्रक नाही मग व्यवहार उघड होण्याची शक्यता नाही, आपले पैसे आपण लपवू शकतो. आता या लपवणुकी मुळे बेकायदेशीर कामं होण्याचा धोका वाढतो.

केंद्र सरकार, RBI आता आपलं अधिकृत आभासी चलन काढण्याच्या विचारात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी देशातले क्रिप्टोकरन्सीचे निर्बंध उठवले. पुन्हा भारतीय गुंतवणूकदारांनी यांत व्यवहार चालू केले. दक्षिण अमेरिकी देश अल्-साल्व्हाडोर या देशाने तर बिटकॉईनला अधिकृत चलन म्हणून स्वीकारलं आहे. असं करणारा हा जगातला पहिला देश ठरला आहे. बिटकॉईनचे भाव आभाळाला भिडत आहेत. यातला अब्जाधीशांचा रस वाढतो. आता सर्वसामान्यांनी ही गोष्ट धान्यात ठेवली पाहिजे की परतावा जास्त आहे म्हणून हाव करता कामा नये. कारण पैसे कमावण्यासाठी हाव नाही तर हुशारी, धीर आणि जागरूकता कामाला येते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole