Freshers आहात? जॉब मिळत नाहीये? Job शोधण्यासाठी ‘या’ पद्धती वापरा, हमखास Job मिळवा

Tips for Finding Jobs – बहुतांश तरूण शिक्षण किंवा पदवी मिळवल्यानंतर नोकरीच्या शोधार्थ भटकत असतात. पुढील शिक्षण घ्यायचे असले तरीही काहीवेळा गरज म्हणून तर काही वेळा अनुभव मिळावा या उद्देशाने नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी बाहेर पडतात. शिक्षण नुकतेच पूर्ण झालेल्या अशा होतकरू नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्रेशर्स म्हणतात.

आपण जेव्हा फ्रेशर्स या गटात असतो तेव्हा नोकरी शोधताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे बहुतांश नोकरी देणाऱ्यांना अनुभवी लोकच हवे असतात. अशा वेळी फ्रेशर्स ने काय करायचे असा प्रश्न साहाजिकच आपल्या मनात येतो. मात्र फ्रेशर्स असूनही काही गोष्टी आपण आत्मसात केल्या तर त्याचा फायदा नोकरी मिळवताना होऊ शकतो.

फ्रेशर्स म्हणून आपल्या शिक्षणानुसार आपण नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो, अनुभवाविना फार यश येत नाही. अगदीच जोर लावला तर एखादी नोकरी मिळतेही पण योग्य दिशेने प्रयत्न केल्यास नोकरी नक्की मिळू शकते. Tips for Finding Jobs

अनुभव मिळवा

फ्रेशर्स म्हणजे विनाअनुभवी, त्यामुळे नोकरी देण्यासाठी लोक फारसे उत्सुक आणि इच्छुकही नसतात. अशा वेळी अनुभव गाठीशी बांधण्यासाठी मदतीला येते ती इंटर्नशिप. अर्थात जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा हा पर्याय फार लाभदायी वाटणार नाही. परंतू भविष्याला आकार देण्याच्या दृष्टीने इंटर्नशीप ही गोष्ट फार महत्वाची आहे. ज्या कंपनीत किंवा आस्थापनेमध्ये तुम्हाला भविष्यात नोकरी करायला आवडेल अशा ठिकाणी इंटर्नशीप करण्याचा प्रयत्न करा.

त्यामुळे तुमच्या क्षेत्रातील कामाची पद्धत, संस्कृती आणि ओळखी निर्माण होतील. इंटर्नशीप चा अर्थच शिकण्याची संधी असा घ्या आणि मनःपूर्वक जितक्या गोष्टी शिकता येतील त्या शिका, आपले सर्वोत्तम ते त्या वेळेत द्या. समजा हव्या त्या क्षेत्रात संधी नाही मिळाली तरीही नोकरीचा अनुभव खूप काही शिकवणारा असतो. एकूणच सुरक्षित जगातून मोकळ्या जगात जबाबदारीने काम निभावताना काय करायला हवे याचे ज्ञान मिळण्यास त्याने मदत होते.

अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन

नोकरी मिळवणे ही तशी कठीण गोष्ट असते त्यातही पहिली नोकरी ही नक्कीच. त्यामुळे आपल्याला ज्यात काम करायचे आहे त्यातल्या अनुभवी लोकांची मदत घ्या. त्यासाठी ओळखी करून घ्या. आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशांची मदत घ्या. सध्या इंटरनेट, सोशल मीडिया तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, पाहुणे मार्गदर्शक यांच्याकडून मार्गदर्शन मदत मिळू शकते.

तंत्रज्ञानाला मित्र बनवा

सध्याच्या घडीला केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावीच लागते. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासह तंत्रज्ञानामध्येही मास्टरी मिळवण्याचा प्रयत्न करा. टेकसॅव्ही हा सध्याचा मूलमंत्र झाला आहे. त्यामुळे ज्या कोणत्याही क्षेत्रात जाताना स्वतःला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या, त्यातील अद्ययावत ज्ञान मिळवित रहा.

रिझ्युमे किंवा प्रोफाईल

हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यामधून तुमचा पहिला प्रभाव अर्थात इम्प्रेशन नोकरी देऊ करणाऱ्यावर पडते. तेव्हा आपला रिझ्युमे किंवा प्रोफाईल आकर्षक बनवण्यासाठी आपल्याला काही कौशल्ये आत्मसात करून ती त्यामध्ये नमूद करावी लागतील. इंटरनेटच्या जमान्यात घरी बसून आपल्याला ज्ञान मिळवण्याची संधीही मिळते त्यामुळे आपल्या क्षेत्राशी जवळीक साधणारे इतर पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करत रहा.

त्याव्यतिरिक्तही काही कौशल्ये असतील तर ती शिकून घ्यावीत. त्यामुळे रिझ्युमे अधिक प्रभावी होऊ शकतो आणि नोकरी देणाऱ्याच्या मनात आपल्या क्षमतेविषयी विश्वास निर्माण होऊ शकतो.


हे हि वाचा –

1 Comment
  1. Komal Dimbar says

    Thank you so much

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole