MPSC PSI परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात दूसरा आलेल्या गणेश येलमारे यांनी सांगितलेली अभ्यासाची पद्धत

PSI Topper Ganesh Yalmare – एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहाणारे अनेक तरूण आजूबाजूला पहायला मिळतात. कठोर परिश्रम, रात्रंदिवस एक करतात. एमएपीएससी परीक्षेचे तीन टप्पे आहेत, पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. बऱ्याच विद्यार्थ्यांना दोन तीन वेळा ही परीक्षा द्यावी लागते. हाताच्या बोटावर मोजता येणारी मुले पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा पास होतात. पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा येणे वगैरे तर खरंतर स्वप्नवत आहे. पण हे स्वप्न पीएसआय गणेश यलमार ने आपल्या कष्टाच्या जोरावर पूर्ण केलं आहे.

गणेश येलमर यांच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना परीक्षेव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींनाही सामोरे जावे लागले. त्यामुळे आधीच खडतर असलेली एमपीएससी ची वाट अधिक खडतर झाली होती. २०१९ ची एमपीएससी ची बॅच. आधी कोरोना नंतर मराठा आरक्षण परीक्षा कधी आणि कोणत्या निकषांवर होणार हे सर्व गुलदस्त्यात असतानाही पीएसआय गणेश येलमर याने नेटाने अभ्यास सुरू ठेवला होता. या आधीच्या आणि नंतरच्याही कोणत्याही बॅचला या प्रकारचा संघर्ष करावा लागणार नाही, लागू नये अशा सदिच्छाही पीएसआय येलमर (PSI Topper Ganesh Yalmare) व्यक्त करतो.

घरची शेती सांभाळणारे आईवडील, भाव भावजय लहानसा व्यवसाय आहे, यांच्या पाठिंब्याशिवाय आणि अफाट कष्टाशिवाय हे यश मिळाले नसते असे पीएसआय गणेश येलमर विनम्रतेने सांगतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स इन्स्टिट्यूमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभ्यास, खेळ बरोबरीने सुरू होते. त्यांची बास्केटबॉलचा टीम राज्य पातळीवर खेळून आली. बारावीला चांगले मार्क पडल्याने कराडच्या सरकारी कॉलेजात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. पण त्या कॉलेजमध्ये एनसीसी नव्हते, ते आणण्यासाठी ही कॉलेजची मुले सलग आठ पंधरा दिवस एनसीसी ऑफिसमध्ये जाऊन जागा मागत होती. शेवटी वैतागून कर्नले आठ जागा या कॉलेजला दिल्या

गणेश येलमरे यांनी तीन वर्ष एनसीसी केले, बेस्ट कॅडेटचे अवार्डही मिळवले. ज्युनिअर अंडर ऑफिसर पदही त्याला मिळाले आहे. लष्करात जायचे असे स्वप्न बाळगून पुण्यात एसएसबी ची तयार करून चार वेळा प्रयत्न करूनही त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर एमपीएससी ची जोरदार तयारी केली. (PSI Exam Strategy) पूर्व परीक्षेत ६० मार्क पडले त्यानंतर मुख्य परीक्षेत १३८ मार्क पडले.

त्यानंतर खरी अवघड परीक्षेला तोंड द्यावे लागले ती म्हणजे फिजिकल परीक्षा. तिने दम काढला. दोन वर्षाच्या लॉकडाऊन मुळे फिजिकल फिटनेस करण्यात अडचणी, खंड पडत होता. त्यांनी अकलूज ला वेळापुरला जाऊन तीन महिने सराव केला. कारण पुण्यात कोणतीही मैदाने खुली नव्हती. पण तरीही गणेश येलमेर यांनी हिंमत न हारता अभ्यास, सराव केला.

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला

MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की तुमचे पूर्ण लक्ष्य अभ्यासात ठेवा, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईड. तुम्हाला अभ्यासाला जे मार्गदर्शक हवे ते स्वतः या प्रक्रियेतून यशस्वी झालेले निवडा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून अभ्यास करा. सातत्यपूर्ण अभ्यास, अभ्यासू विद्यार्थ्यांचा ग्रुप असला पाहिजे. जेणेकरून तुमचा फोकस हालत नाही. एकमेकांच्या सोबतीने अभ्यास करणे, शारिरीक तंदुरूस्तीसाठी सराव, ग्रुप डिस्कशनचा सराव यासाठी त्याचा फायदा होतो. पण लक्ष्य मात्र परिक्षा हेच ठेवा. अभ्यासाच्या त्या काळात इतरत्र कुठेही न भरकटता अभ्यास केला तर पहिल्या प्रयत्नातही व्यक्ती सहजपणे एमपीएससी परीक्षा पास होऊ शकते, हे गणेश येलमारे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.


हे वाचलंत का?

1 Comment
  1. sanket fartare says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole