MPSC नोकरदार व गृहिणींसाठी अभ्यासाचे नियोजन

MPSC study plan for working people – स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न अनेक जण पाहात असतात, प्रत्येकाला क्लास लावून केवळ परीक्षेसाठीच वेळ देणे शक्य होऊ शकते असे नाही. काही जणांवर कौटुंबिक, आर्थिक जबाबदारी असते म्हणून त्यांना नोकरी करावी लागते, पण उराशी अधिकारी होण्याचे स्वप्न ते बाळगून असतात. मुलींच्या बाबतीत पदवीधऱ झाल्यानंतर काही ठिकाणी लग्न लावून दिले जात असल्याने त्यांच्यावरही अभ्यासाला मर्यादा येतात. तरीही अभ्यास करून अधिकारी होण्याचे त्यांचे ध्येय असते.

मात्र एमपीएससी ही स्पर्धा परीक्षा असल्याने त्यात स्पर्धेचं आव्हान तगडं असतं. त्यामुळेच अभ्यासासाठी वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. कारण कमी वेळेत भरपूर अभ्यास करायचा असतो. एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी काही शहरे नावाजली जातात तिथे क्लासेस भरपूर असतात. मग आपला सगळा व्याप सांभाळून अभ्यास करणाऱ्यांना त्याविषयी थोडा खेद वाटतो की आपल्याला वेळ नाही.

मग नोकरदार आणि गृहिणींनी अभ्यास कसा करावा याचा विचार करूया. एक लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा ही वेळ लागणारी प्रक्रिया असल्याने जेव्हा आपल्याला आर्थिक बाजू किंवा कौटुंबिक बाजू सांभाळून अभ्यास करायचा आहे तेव्हा दोन्ही बाजू सांभाळायची तारेवरची कसरत असते. नोकरदार व्यक्तींना स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ पाहता आर्थिक बाजू कायमच भक्कम ठेवायची आहे आणि गृहिणींना कुटुंबाला वेळ देत सांभाळण्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. या दोन्ही गोष्टी सोडून देता येणार नाही याची स्पष्टता आपल्याकडे असली पाहिजे. कारण आर्थिक बाजू कमजोर झाली तर येणारे नैराश्य अधिक त्रासदायक होता.

नोकरी आणि कुटुंब सांभाळतही स्पर्धा परीक्षा नक्कीच पास करता येऊ शकता. एकदा तुम्ही आर्थिक स्थिर असलात तर घरच्यांना तणाव नसतो त्यांचेही प्रोत्साहन मिळते. एमपीएससी स्पर्धेसाठी दिवसाला १६-१८ तास अभ्यास करावा लागतो, समूहचर्चा कराव्या लागतात, खूप जास्त कॉन्स्ट्रेसन लागते. तसंच वय वाढले की ही परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड आहे हे सर्व गैरसमज आहेत.

मुळातच नोकरदार, गृहिणी यांच्याकडे वेळ कमी असल्याने मिळालेल्या पाच ते सहा तास अभ्यास ते पूर्णपणे लक्ष देऊन करतात. साहाजिकच नेमका अभ्यास होतो. मुळात एमपीएससी ही बहुपर्यायी उत्तरांची परीक्षा आहे. त्यामुळे साहाजिकच एकाग्रता खूप हवी असे नाही पण आपल्या सबकॉन्शिअस स्मरणशक्तीचा इथे खूप जास्त उपयोग होऊ शकतो.

गृहिणी, नोकरदार या व्यक्तींनी प्रामाणिकपणा, इच्छाशक्ती ठेवली पाहिजे. परीक्षेसाठी विशिष्ट शहर, वय याचा काही अडथळा येत नाही. इंग्रजीचा बाऊ करू नका. रोज नियमित नव्या शब्दांचा सराव करा. रोज दोन नवे इंग्रजी शब्द शिका. ज्यांचे मराठी चांगले नाही त्यांनी रोज मराठी वर्तमानपत्र वाचा मराठी भाषा सुधारेल. वाचनाचा वेग वाढवण्यासाठीही स्वतःला वेळ द्या. पाच सहा वेळा वाचल्यानंतर गोष्टी लक्षात राहातात त्यामुळे नियमित अभ्यासाची सवय लावून घ्या. एकाग्रता वाढवण्यासाठीही नियमित अभ्यास हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

नोकरदार, गृहिणी यांनी अभ्यासाला ४-५ तास मिळाले तरीही उत्तम अभ्यास होऊ शकतो. सकाळी पाच वाचता उठून सकाळी ८ वाजेपर्यंत अभ्यास करा. संध्याकाळी झोपण्याआधी ९-११ हा वेळ अभ्यास करू शकतो. अभ्यासाबरोबर स्वतःला, कुटुंबियांना वेळ देणेही गरजेचे असते त्यामुळे शनिवार -रविवारही नियमित अभ्यास करता तेवढाच वेळ करा.

एमपीएससी चा अभ्यास करताना मिळालेल्या वेळेचे नियोजन करताना प्रश्नपत्रिका सोडवणे किंवा सोडवलेल्या प्रश्नपत्रिका वाचत रहावी. आपल्याकडे वेळ कमी असल्याने मोजकी पुस्तके पण महत्त्वाची पुस्तके वाचा. मिळालेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त पुस्तकाचे वाचन करावे, त्यातील महत्त्वाच्या गोष्टींखाली रेषा आखाव्यात. वाचलेल्या गोष्टींची उजळणी करायची आणि त्यानंतर जनरल स्टडीज चा अभ्यास करावा. आखलेला वेळ याच पद्धतीने अभ्यासासाठी वापरायचा.
जेव्हा घाईगडबड असेल, सतत व्यत्यय येणार असेल, तेव्हा एमसीक्यूचे प्रश्न सोडवणे, वर्तमानपत्र वाचणे, मासिके वाचणे, गरज असेल तर नोटस् काढा तसेच करंट अफेअर्सविषयीचे व्हिडिओ पहा, ऐका. त्यामुळे सबकॉन्शन मेंदूचा वापर इथे होतो. शक्य असेल तर ग्रुप डिस्कशन करा, एमसीक्यू चे प्रशन् सोडवा. सीसॅट चे प्रश्न सोडवा.

घरात पाहुणे आलेले असतील, तर संपूर्ण लक्ष देणे शक्य नसते तेव्हा मिळेल तो वेळ सत्कारणी लावत अभ्यास करा.

सकाळी अभ्यास करताना स्कोरिंग करून देणारे विषय आधी वाचायचे. कमी गुण मिळवून देणारे विषय नंतर वाचायचे. आता दिवसभरात समजा पाच तास मिळणार असतील तर अभ्यासाचे नियोजन करताना एका विषयाला अडीच तास द्या, दुसऱ्या विषयाला दीड तास द्या. एक तास सर्व अभ्यासाच्या रिवीजनसाठी द्या. रात्री वाचलेल्या गोष्टींची उजळणी मनात करायची.

ज्या विषयाचा अभ्यास ८० टक्के झाला त्याला पुढे टाकत त्याला दीड तास द्यायचा. पहिले अडीच तास दुसऱ्या विषयाला हात घाला. उजळणी किंवा रिवीजन मात्र न चुकता झाली पाहिजे. सवयीने वाचनाचा वेग वाढल्यानंतर एका दिवसात दोन विषय होऊ लागतात.

या सर्वात एक गोष्ट मनाशी पक्की ठरवा ती म्हणजे अमूक वेळेतच परीक्षा उत्तीर्ण होईन, दिवसाला अमूक इतके तास, इतका अभ्यास करेन किंवा एखादा विषय इतक्या दिवसांत पूर्ण करेन असे टार्गेट ठेवू नका. प्रामाणिकपणे आणि इच्छाशक्ती बाळगून अभ्यास करा. घरच्या, कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ काढताना, दोन कामांच्या मध्ये अभ्यास करता येईल.

नोकरदार आणि गृहिणी यांना जबाबदाऱ्या पाडत ही परीक्षा द्यायची आहे त्यामुळे स्वप्नात न रमता प्रॅक्टीकल विचार करून अभ्यासाचे नियोजन केल्यास एमपीएससी परीक्षा पास होणं अवघड वाटणार नाही. अर्थात स्पर्धा परीक्षा ही संयमाचीही परीक्षा असते त्यामुळे शांत राहून मिळणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करावा.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole