स्पर्धा परीक्षा देताना चालू घडामोडींची तयारी कशी करावी?

कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विज्ञान (science), इतिहास (History), भूगोल( Geography), राजशास्त्र (Political Science) व बाकी अन्य विषयांबरोबरच चालू घडामोडी (MPSC Current Affairs Strategy) हा ही एक महत्वाचा विषय असतो. याची तयारी ही बाकी विषयांपेक्षा अगदीच वेगळ्या पद्धतीने करावी लागते. त्याची ही एक अशी खास पद्धत आहे, तर त्यानुसार आपली चांगली तयारी होऊ शकते. तर जाणून घेऊयात कोणत्या खास पद्धतीने चालू घडामोडी या विषयाची चांगली तयारी करता येईल?

MPSC Current Affairs Strategy –

  • चालू घडामोडींचा अभ्यास करताना कोणत्या परिक्षेकरता या विषयाची तयारी करावयाची आहे, तसेच त्या संबंधित परीक्षेत कशा प्रकारच्या चालू घडामोडींवरील प्रश्न विचारले जातात, याची नीट माहिती असणं खूप आवश्यक आहे.
  • प्रत्येक परीक्षेची चालू घडामोडींची मागणी वेगवेगळी असते. गट ब आणि क तसेच राज्यसेवा या परीक्षांमध्ये चालू घडामोडींवर जे प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये वेगळेपणा असतो. पूर्व परिक्षेबरोबर मुख्य परीक्षेतही विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये फरक असतो. आधीच्या झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पहिल्या तर ही बाब लक्षात येते.
  • परीक्षार्थी उमेदवारांनी ज्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं ते म्हणजे चालू घडामोडींमध्ये असे घटक ज्यांवर सातत्याने प्रश्न विचारले जातात, ते ठराविक घटक आहेत.
  • या विविध घटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या घडामोडी ठरलेल्या आहेत. परीक्षेत कायम त्यावर आधारित प्रश्न येत असतात. आता अधिवेशनात कायदेमंडळाकडून होणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकांवर आधारित प्रश्न कायम विचारले जातात. यांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.
  • दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या अशा काही गोष्टी व घटना ज्यांचा राष्ट्रीय व जागतिक स्तरावर परिणाम होतो, अशा घटनांच्या नीट नोंदी ठेवणं आवश्यक आहे. जसं की भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इसरो (ISRO) च्या विविध मोहिमा, आंदोलने, मोठे निर्मिती प्रकल्प इ.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अशा घडामोडी ज्या प्रथमतःच घडल्या आहेत. यांवर तर हमखास प्रश्न येतात. म्हणून स्पर्धा परीक्षेचे परीक्षार्थी हे या घडामोडी अजिबात सोडत नाहीत.
  • चालू घडामोडी असा राज्यसेवा मुख्य परीक्षेत काही वेगळा विषय नसतो. पण अभ्यासक्रमातील बाकी विषयांबाबतीत असणाऱ्या अद्ययावत चालू घडामोडी माहिती असणं आवश्यक आहे. २०२० च्या मुख्यसेवा परीक्षेत सामान्य अध्ययन १ – ४ मध्ये तीसेक प्रश्न चालू घडामोडींवर आधारित होते. म्हणून राज्यसेवा देणाऱ्यांनी पूर्व , मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करतानाही चालू घडामोडींचा अभ्यास करावा.
  • परीक्षांच्या आधी कमीतकमी २ आठवडे तरी सर्व चालू घडामोडींचा अभ्यास करत बसणे योग्य नाही. ठराविक घडामोडींचा सराव जास्तीतजास्त करावा. देशातील व जगातील महत्वाच्या असणाऱ्या घडामोडी म्हणजे पुरस्कार, क्रीडा, देशा-देशांतील संबंध इ. असे जे घटक आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यांची तयारी जास्त करावी. बाकी घटक बाजूला ठेवावेत.
  • जी संदर्भ पुस्तके आपल्याकडे असतात, त्यातील कुठलीच माहिती ही अनावश्यक नसते. स्पर्धा परीक्षा देताना ही माहिती केंव्हा ना केंव्हा उपयोगाला येत असते. पण आपली तयारी कोणत्या परीक्षेसाठी आहे, हे पाहून त्या पुस्तकातील जो भाग महत्वाचा तेवढा करावा बाकी सोडून द्यावा. उदा. संयुक्त परीक्षा गट ब ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सेवा मुख्य परीक्षेची माहिती नकोशी वाटते. पण राज्यसेवा देणाऱ्यांसाठी ती अत्यंत महत्वाची असते.
  • स्पर्धा परीक्षेची तयारी करताना फक्त पूर्व परीक्षा इतकाच मुद्दा नाही, तर ही प्रक्रिया पूर्व तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत अशी तीन टप्प्यांची असते. पूर्व-मुख्य या दोन्हींचा अभ्यासक्रम तोंडपाठ असायला हवा.
  • अभ्यासक्रम, सोबत संदर्भ पुस्तकं आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका हेच आपले दिशा दर्शक आहेत. अभ्यासक्रमावरून आपण काय काय घटकांची तयारी करायची याचा अंदाज येतो तर संदर्भ पुस्तकांतून आपल्याला आवश्यक घटकांची आपण पटकन तयारी करू शकतो. आणि प्रश्नपत्रिका या आपल्याला आपली तयारी कोणत्या पद्धतीने करायची आहे? याचं मार्गदर्शन करतात.

1 Comment
  1. Raj says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole