MPSC परीक्षांसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अत्यावश्यक असते का ?

MPSC And English – भारतात इंग्रजी भाषा फाड फाड बोलता आली म्हणजे तो साहेब माणूस अशी समझूत आहे. कोणीही मोठा अधिकारी आहे म्हणजे त्याला इंग्रजी येत असणारच असाही समज त्याबरोबर येतोच. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षा पास होणे म्हणजे उच्च दर्जाचे इंग्रजी यायलाच हवे असा न्यूनगंड अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. अगदी सरळ भाषेत सांगायचं तर कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी इंग्रजी यायला हवे असं काही नाही पण इंग्रजी भाषेचे साधे ज्ञान आवश्यक आहे जे तुम्हाला भाषा पेपर मध्ये चांगले मार्क मिळवून देईल.

MPSC परीक्षेत इंग्रजीचे महत्व काय ?

एमपीएससीच्या परीक्षा मराठी माध्यमातून देता येतात. मुलाखतमराठी माध्यमातून देता येत असल्याने इंग्रजी भाषेचे जुजबी ज्ञान असल्यास उमेदवाराला अधिकारी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षेत पेपर-२ मध्ये इंग्रजी भाषेचे आकलन हा घटक सुमारे १० प्रश्न व २५ गुणासाठी आहे. येथे इंग्रजी भाषेतील २ किंवा ३ उतारे देऊन त्यावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत भाषा विषयाचे २ पेपर्स आहेत त्यापैकी भाषा पेपर-१ मध्ये इंग्रजी भाषेतील निबंध ( २५ गुण) भाषांतर (१५ गुण) व सारांशलेखन (१० गुण) असे ५० गुण व आहेत. तर भाषा पेपर-२ मध्ये इंग्रजी भाषेचे व्याकरण, शब्दसंग्रह क्या म्हणी-वाक्प्रचार यावर ५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. गेल्या दहा वर्षातील या परीक्षेतील प्रश्नपत्रिका सोडविल्यास इंग्रजी भाषेची खूप चांगली तयारी होते. थोडक्यात, इंग्रजी कचे आहे म्हणून एमपीएससी परीक्षांमध्ये अपयश आले असे क्वचितच होते. थोडक्यात, इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नये, तसेच दुसऱ्या बाजूला इंग्रजीच्या दबावाखाली घाबरूनही जाऊ नये.

(MPSC And English) सारांश –

१. राज्यसेवा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न मराठी तसेच इंग्रजी भाषेत असतात.
२. उच्च दर्जाची इंग्रजी यायलाच हवी अशी कोणतीही अट नाही.
३. पण परीक्षेत इंग्रजी भाषेचे आकलन करण्याइतपत सामान्य इंग्रजी यायला हवे.


1 Comment
  1. Tushar wagh says

    Mpsc

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole