MPSC च्या उमेदवाराकडून काय अपेक्षा असतात?

MPSC परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये आयोगाला उमेदवाराकडून काय अपेक्षित आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यात सुरुवातीलाच लिहिलेले आहे की,

१) The candidate would be expected to be aware of the events and happenings around them.

२) उमेदवाराला सदर परीक्षेत गुण देताना आयोग कशाला प्राधान्य देते तेही नमूद केले आहे – “the candidate would be awarded marks for the clarity of thought and brevity of expression apart from several other virtues like the economy of words, precise expressions, clarity of concepts, etc.”

३) या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरातून, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत उमेदवाराची वैयक्तिक मते तपासून पाहिली जातात. उमेदवाराची मते खरेच सकारात्मक आहेत का, समतोल आहेत का, उपयुक्त आहेत का आणि मुख्य म्हणजे ती त्याची स्वतःची आहेत की दुसऱ्या कोणाच्या प्रभावामुळे विकसित झाली आहेत, तो एखाद्या विचारसरणीच्या आहारी गेला आहे का, एखाद्या घटनेचा सर्व दृष्टिकोनातून सारासार विचार करून त्याला सुवर्णमध्य काढता येतो का, हे सर्व काटेकोरपणे तपासले जाते.

स्पर्धा परीक्षेतील यश, ही सापेक्ष संकल्पना आहे. तिचे संदर्भ हे व्यक्ती स्थळ व कालपरत्वे नेहमीच बदलत असतात. या परीक्षेद्वारे निवडले जाणारे उमेदवार हे फक्त एखादी नोकरी करण्यासाठी निवडले जात नाहीत, तर आपला देश, समाज आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व क्षेत्राचा विकास करण्यासाठी जे सक्षम कार्यकर्ते लागतात, त्यासाठी निवडले जातात.

थोडक्यात, MPSC परीक्षा फक्त नोकरी मिळविण्याची परीक्षा नसून, ती एखाद्या उमेदवारास प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी द्यावी लागणारी पात्रता परीक्षा आहे. त्यामुळेच येथे उमेदवाराच्या ज्ञानापेक्षा त्याची आकलनक्षमता तपासली जाते.

परिणामी निवड प्रक्रियेत अधिकारी होण्यासाठी एखाद्या उमेदवाराकडे असलेली फक्त प्रबळ इच्छाशक्ती इथे महत्त्वाची नसून, अधिकारी होण्यासाठी लागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्याच्यामध्ये किती प्रगल्भपणे विकसित झाले आहेत आणि त्यानुसार त्याग, कष्ट, परिश्रम करून स्वतःला शिस्त लावण्याची त्याची तयारी किती आहे, हे महत्त्वाचे ठरते.

स्पर्धा परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपरमध्ये कशाचा समावेश असावा, याबाबत १९७० च्या दशकात कोठारी समितीच्या शिफारशींचा युपीएससीने विचार केला होता. त्यावेळी त्याचे अनुकरण एमपीएससीने केले होते. त्या अहवालातील नोंदीनुसार “ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे त्याच्याकडे पुढील प्रकारचे कौशल्य असावे –

१) विविध क्षेत्रातील घटनांची त्याला आवड असावी.
२) त्याच्यासभोवती घडणाऱ्या घटनांबाबत जागरूक असावा.
३)त्याच्याकडे भारत देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी.


पुढील लेखMPSC परीक्षा स्पर्धात्मक असते म्हणजे नेमके काय ?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole