MPSC परीक्षा स्पर्धात्मक असते म्हणजे नेमके काय ?

MPSC एमपीएससी द्वारे गेल्या काही वर्षापासून वर्षाला २० ते ३० परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा विविध अधिकारी पदांच्या भरतीसाठी असतात. यातील महत्त्वाच्या परीक्षा या एकाच टप्प्यात न घेता त्या पूर्व मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यावर घेतल्या जातात. काही परीक्षांमध्ये शारीरिक चाचणीचा टप्पा असतो.

एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला २०१६ मध्ये सुमारे २.५० लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातून ४ हजार जणांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. मुलाखतीसाठी सुमारे १००० जण निवडले जातात, तर अंतिम यादीत सुमारे २५० अधिकाऱ्यांची निवड होते.

म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेच्या निकालाचे प्रमाण हे 0.00१ टक्का येते. म्हणजेच १००० विद्यार्थ्यांमधून एकाची निवड होते. या परीक्षांना अगदी साध्या बीए पदवीधरापासून पीएचडी झालेले तसेच डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए झालेले अशा विविध शैक्षणिक पार्श्वभूमीचे उमेदवार बसतात. तसेच वयाच्या २१ वर्षापासून ३८ (४३) वर्षांपर्यंतचे उमेदवार या परीक्षेच्या स्पर्धेत उतरतात.

त्यामुळे वय, गुणवत्ता आणि अनुभव याबाबतीत ही परीक्षा विषमतेचीच असते. तसेच या परीक्षेत एखादा उमेदवार मुलाखतीपर्यंत गेला आणि त्यात तो अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुन्हा नव्याने पूर्व, मुख्य आणि मुलाखत या सर्व प्रक्रियेतून जावे लागते. म्हणूनच MPSC ची फक्त पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे यश मिळवणे असे नाही तर पूर्व, मुख्य व मुलाखत या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होणे आवश्यक आहे.

आता या संपूर्ण चक्राचा आपण बारकाईने अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल स्पर्धात्मक असणे म्हणजे काय. कारण शाळेत किंवा त्यानंतर दिलेल्या बोर्ड परीक्षेत ३५ टक्केच्या वर सगळेच पास होतात पण स्पर्धा परीक्षेत फक्त ठराविक विद्यार्थीच त्या पदासाठी पात्र ठरतात म्हणजेच इतर सर्वजण नापास होय. यालाच स्पर्धा परीक्षा म्हणतात.


पुढील लेख – MPSC राज्यसेवा परीक्षेत किती व कोणते टप्पे असतात ?

2 Comments
  1. Chetan patil says

    Hi

  2. Chetan patil says

    Question

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.