Mpsc चा अभ्यास करताना कुठून सुरुवात करावी | How to Start MPSC Study in Marathi

MPSC Strategy – सर्वसाधारणपणे बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर एमपीएससी करायचेय हे डोक्यात ठेवून पुढील शिक्षणाची वाट निवडली जाते. राज्यसेवा परीक्षा द्यायची नक्की केल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न समोर उभा असतो की याचा अभ्यास कसा करावा किंवा कुठुन सुरुवात करायची. शहरांमध्ये मोफत मार्गदर्शन कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती मिळते. मात्र अडचण होते ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची. त्यांना नेमके मार्गदर्शन (MPSC Exam Preparation) मिळत नाही, मग सुरूवात भरकटल्यासारखी होऊ शकते. त्यांनी अभ्यासासाठी शहरात येणे हा एक मार्ग असला तरीही मुळात अभ्यास सुरू कुठून करायचा हे समजणे फार महत्त्वाचे आहे.

MPSC Strategy

राज्यसेवा काय किंवा केंद्रसेवा काय या दोन्ही परीक्षा स्पर्धा परीक्षा असल्याने त्याला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात असते. त्यामुळे अभ्यास कऱण्याच्या क्षमतेचा इथे कस लागणार असतो. म्हणून स्पर्धा परीक्षेला बसण्याआधी आपल्याला अभ्यासाची गोडी लावून घ्या, एकट्याने आणि दररोज न चुकता मन लावून अभ्यास करण्याची सवय लावून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आता पुढची पायरी म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी परीक्षेची तयारी करणार आहात हे मनाशी पक्के ठरवा. त्यानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे माहित करून घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पदासाठी आपण परीक्षा देतो आहोत त्यासाठी आपली इतर सर्व पात्रता जुळते आहे का याचाही विचार करायला हवा. जर सर्वच परीक्षांची तयारी करून जिथे निवड तिथे जायचे असा विचार करत असाल तर सर्वसाधारणपणे एमपीएससीचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहून सुरूवात करावी.

अभ्यासक्रमात आपण प्राथमिक शाळेत शिकतो त्यावेळचा अभ्यासही दिसेल. तो नेमका किती आहे काय आहे ते पाहून त्याचे मूळ पुस्तक म्हणजे बोर्डाने नेमून दिलेले पुस्तक वाचायचे. त्यातून संकल्पना पुन्हा स्पष्ट होतील, त्या आठवतील. स्टेट बोर्ड पुस्तके या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

अभ्यास कसा करायचा

एमपीएससी साठी अशी पुस्तके असतात ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला असतो. एकाच पुस्तकात सर्व गोष्टी दिलेल्या असतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमका कोणता विषय आवडतो त्यानुसार विषय निवडून त्याचा प्रथम अभ्यास सुरू करावा. त्याशिवाय पदवी परिक्षेला आपला एखादा विषय पक्का झालेला असतो किंवा त्यात विशेष अभ्यास केलेला असतो त्या विषयापासून सुरूवात केली तरी चालते कारण तो विषय आपल्या डोक्यात पक्का झालेला असतो, तो डोळ्याखालून, हाताखालून गेलेला असतो. अर्थात हा एकच विषय नसल्याने इतर विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सोप्या विषयांच्या प्रश्नपत्रिका पहा, प्रश्नांचे विश्लेषण करा (MPSC Previous Question Papers) आणि मग पुस्तके वाचायला सुरूवात करा. जेणेकरून काय वाचायचे आणि काय वगळायचे हे समजेल. त्यामुळे अभ्यासाचा कंटाळाही येणार नाही.

किती वेळ अभ्यास करायचा

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला एक बैठक आवश्यक असते. सुरूवातीच्या उत्साहात १०-१२ तास अभ्यास केला जातो नंतर उत्साह, उर्जा कमी होत जेमतेम ५-६ तास अभ्यास केला जातो. त्यामुळे अभ्यासाची सवय करताना उलट करा ते म्हणजे पाच सहा तासापासून सुरूवात करत हळुहळु वेळ वाढवा. अधे मधे विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला बसता येऊ शकेल. तसेच ठरलेल्या दिवसात ठरलेला अभ्यास पूर्ण करायचा ही गोष्ट पक्की ठरवा त्यामुळे अभ्यासाची एक बैठक तयार होईल.


हे ही वाचा –

1 Comment
  1. Aniket Sunil LANGOTE says

    Nice konte books use kariche astat te email la send kra books name te

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole