जिल्हा सत्र न्यायालयात 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..56900 पगार मिळेल

District Court Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अकोला जिल्हा न्यायालय (District Court Akola) येथे पूस्तक बांधणीकार पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२२ आहे. 

District Court Bharti 2022 एकूण जागा : ०४

पदाचे नाव : पूस्तक बांधणीकार/ Bookbinder

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण असावा ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणी बाबत कोर्स उत्तीर्ण असावा ०३) उमेदवाराला पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक व व्यवसायीक माहिती आवश्यक आहे.

वयो मर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

कामाचे स्वरूप:
निवड झालेल्या उमेदवारास अकोला जिल्हा न्यायिक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात पुस्तक बांधणीकार या पदावर नियुक्ती दिली जाईल. नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणा-या फाईल्स, नोंदवहया इत्यादी ची बांधणी करणे इत्यादी कर्तव्य पार पाडावी लागतील. त्याच प्रमाणे अधिकारी यांचे निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. पुस्तक बांधणीकार हे पद एकाकी असून, त्या पदास पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही, या बाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वेतनश्रेणी: सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर एस-५ संरचनेत रूपये १८,०००-५६९००/- व नियमानुसार देय भत्ते, या सुधारित वेतन

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.

अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole