MPSC टॉपर प्रसाद चौगले म्हणतात, अभ्यासात फक्त या ६ गोष्टी केल्या

MPSC Topper Prasad Chougale – छान सुरळित १०-६ या वेळेतली नोकरी, ५ लाख रूपयाचा उत्तम पगार, पाच दिवसांचा आठवडा… सगळं छान सुरळित सुरू होतं. पण मन काही त्यात रमत नव्हतं. मग मित्रांच्या सल्ल्यानं एमपीएससीची परीक्षा द्यायचं ठरवून उडी मारली..

एमपीएससी २०१९ च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले प्रसाद चौगुले सांगत होते. मुळचे कराडचे असलेल्या प्रसाद चौगुले यांचे प्राथमिक शिक्षण कराडमध्ये झालं. त्यानंतर सहावीत साताऱ्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात नंबर लागला आणि तिथे पुढचे शिक्षण झाले. ह्या निवासी शाळेत उत्तम शिक्षण मिळावे अशी आईवडिलांची इच्छा होती त्यामुळे प्रसाद चौगुले यांना त्या शाळेत घातले.

शिक्षण हेच भांडवल आहे आणि त्याच जोरावर तुला यशस्वी व्हायचं आहे, असे आईवडील सांगायचे असे प्रसाद चौगुले सांगतात. त्यामुळे सहावीपासून बाहेर राहायला लागल्याने संघर्ष माहित होता, आत्मनिर्भर होण्यास मदत झाली होती. तिथे ट्यूशन हा प्रकारच मिळणार नव्हता, स्वतःच अभ्यास करायचा, पुस्तकं वाचायची ही सवय त्यांना लागली.

प्रसाद चौगुले यांचे आईवडिल उच्चशिक्षित नाहीत परंतू मुलांना शिकवण्याकडे त्यांचा कल होता. नवोदय विद्यालयात नियमित अभ्यासाची सवय लागली होती, शिक्षक उत्तम लाभल्याने पायाही पक्का झाला. दहावीनंतर प्रसाद यांनी आईवडिलांच्या इच्छेनुसार इंजिनिअरिंगला जायचे ठरवले. प्रवेश परीक्षेतही उत्तम गुण मिळाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये महाविद्यालयात टॉपर राहिले होते. शेवटच्या वर्षी सिएट इंडियामध्ये प्लेसमेंट मिळाली. त्यामुळे आता सर्व सुरळीत सुरू झाले अशी मनाची खात्री होती.

नोकरी मिळाल्याने घरचे आनंदात होते. तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा काळ चांगल्या गेला पण प्रत्यक्ष नोकरी सुरू झाल्यानंतर या नोकरी पेक्षाही बरे काहीतरी नक्कीच करता येईल असे वाटू लागले. तसेच रोज नोकरीला यायला तीन तास लागायचे तेव्हा नोकरीत आपण अडकतोय असे वाटू होते. कंपनीत लागलेले काही मित्र आधीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांची पुस्तके पाहिल्यानंतर प्रसाद यांना कुठेतरी आपला रस यात आहे अशी जाणीव झाली होती. लग्न झालेल्या बहिणीबरोबर आणि मेव्हण्यांबरोबर चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रसाद यांना प्रोत्साहन दिले.

नोकरीमध्ये कंपनीबरोबर दोन वर्षाचा बॉन्ड होता, तीन लाखाचा बॉन्ड होता. कराराचे एक वर्ष बाकी होते. त्यामुळे नोकरी सोडून जर स्पर्धा परीक्षेत उतरलो आणि अपयश आले तर हाती आले धुपाटणे अशी भावना होईल असा विचार प्रसाद यांच्या मनात आला होता. नोकरी करत असाताना कम्बाईन परीक्षेचा अटेम्प्ट दिला होता, त्यात निवड झाली होती. त्यासाठी फार अभ्यास केला नव्हता. त्यामुळे जरा जोर लावला तर एमपीएससी ची परीक्षा निश्चित पास होऊ असा आत्मविश्वास प्रसाद यांना होता. त्यामुळे कॅलक्य़ुलेटेड रिस्क घेऊन २०१९ सालची परीक्षा देण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

घरच्यांचा अर्थातच संपूर्ण पाठिंबा प्रसाद यांना मिळाला होता. मुख्य म्हणजे एमपीएससीची परीक्षा देण्याआधी त्याची सर्व माहिती प्रसाद यांनी गोळा केली. कोणत्या पोस्ट, अभ्यासाच्या पद्धती सर्व जाणून घेतली होती.

नोकरी सोडली आणि पुण्याला अभ्यासाला सुरूवात केली. पण त्यानंतर दोन तीन महिन्यांनंतर वडिलांना पॅऱालिसिसचा अटॅक आला आणि पाच दिवस ते वडिलांबरोबर रूग्णालयात राहिलो होतो. तेव्हा त्यांनी असा विचार केला की वडिलांना जर काही झालं असतं तर सर्वच जबाबदारी आपल्यावर आली असती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा हा आपला पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट असेल. त्यामुळे या एकाच अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास व्हायचे आहे. अभ्यास तर पहिल्यापासूनच उत्तम सुरू होता. पूर्व परीक्षेआधीच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता.

प्रसाद यांचा पूर्व परीक्षेत उत्तम गुण आले होते त्यामुळे त्यांना तातडीने मुख्य परीक्षेचा अभ्यासाला सुरूवात केली. शेवटचे दोन महिने त्यांनी उजळणीसाठी दिले होते. एमपीएससी परीक्षा देताना उजळणीला फार महत्त्व आहे. स्कोरिंग विषयाला अधिक वेळ देणे, वाचन पूर्ण करणे या गोष्टींचा नियोजनात अंतर्भाव केला होता.

या परीक्षेसाठी मार्क्सवादी असले पाहिजे असे सांगून प्रसाद सांगतात की स्कोरिंग विषयाला अधिक वेळ द्या, कमीत कमी पण उत्तम पुस्तके वाचा आणि प्रत्येक विषयाची उत्तम उजळणी हा या परीक्षेच्या यशाचा मंत्र आहे. मुख्य परीक्षा दिल्यानंतर प्रसाद यांना खात्री होतीच की उत्तम गुण मिळतात. मुलाखतीच्या तयारीसाठी काही मॉक इंटरव्हू दिले होते. काय पद्धतीने मुलाखत घेतली जाते याची माहिती घेतली. माझ्या विषयाशी निगडीत सर्वच प्रश्न तयार केले, तसेच प्रश्न आले. त्याची योग्य ती उत्तरे दिली.

मात्र मुलाखतीनंतर आपण किमान पहिल्या तीन क्रमांकात येऊ अशी खात्री प्रसाद यांना होती. कोरोनाच्या साथीमुळे परीक्षेचा निकाल लांबला. १९ जूनला मित्राचा फोन प्रसाद यांना गेला तेव्हा प्रसाद चौगुले हे राज्यातून पहिले आहेत. त्यानंतर प्रसाद यांनी वेबसाईट पाहून खात्री केल्यानंतर आईवडिलांना ही बातमी दिली. त्यांच्या डोळ्यातून आलेल्या आनंदाश्रूंमध्ये प्रसाद यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना प्रसाद यांच्या मनात आली.

एमपीएससी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना प्रसाद चौगुले सांगतात की, माझ्यासाठी ही परीक्षा देणे हा धोका पत्करण्यासारखे होते, परंतू संपूर्ण माहिती करून घेतल्याने हा धोका यशात परावर्तित झाला. त्यामुळे हुरळून जाऊन परीक्षा देण्यापेक्षा व्यवस्थित माहिती घेऊन परीक्षा दिली तर त्यात यश नक्कीच मिळेल.


हे वाचलंत का?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole