Omicron पासून वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा मास्क वापरायचा? जाणून घ्या…

२०२१ च्या उत्तरार्धात जरा निर्धास्त होतो, कोरोनाचा विळखा सैल झाला होता. आपण हवं तसं आयुष्य जगत होतो. पण या नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे (third wave of covid19), असं ही बोललं जात आहे. ओमायक्रॉन हा कोरोना चा नवीन प्रकार (Omicron variant) सध्या खूप धुमाकूळ घालत आहे. आधीच्या प्रकारांहून अधिक वेगाने याचा फैलाव होताना दिसत आहे. आणि याच्यामुळेच पुन्हा एकवार सरकारने निर्बंध लादले आहेत. पुन्हा एकदा नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली. आपल्या सर्वांना नियम पाळावेच लागणार आहेत.

आपण अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून नक्कीच ऐकली असेल, तर त्यात सांगितलं आहे की, कोरोनाला ठेवायचं असेल दूर तर मास्क वापरा जरूर. कारण मास्क ही कोरोनाशी दोन हात करताना असलेली ढाल आहे. आपल्या देशातील आरोग्य तज्ज्ञ याबद्दल मार्गदर्शन करताना सांगितलं आहे की कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्क महत्वाचा आहे. पण सध्या बाजारात इतक्या प्रकारचे मास्क आढळून येतात की लोकांचा गोंधळ होतो की कोणता मास्क घालावा? तर याबद्दलची माहिती घेऊयात,

आपण औषधाच्या दुकानात गेलो तर सहसा आपल्याला तीन प्रकारचे मास्क दाखवले जातात, ते म्हणजे कापडी मास्क (cloth mask), एन्-९५ मास्क (N – 95 mask), सर्जिकल मास्क (Surgical mask). प्रत्येक मास्क कापडापासूनच तयार होतो, पण प्रकारानुसार हे कापड बदललेलं असतं. हे कापड कोणत्या प्रकारचं आहे, याचीही माहिती घ्यायला हवी.

कापडी मास्क वापरावा का?

Omicron च्या आधीच्या दोन्ही लाटेत कापडी मास्क वापरला तर चालतो, असं सांगण्यात आलं होतं. हा कापडी मास्क शक्यतो सुती कापडाचा (Cotton) बनवलेला असतो. तो हलका, श्वास सहज घेता येईल असा असतो. पहिल्या लाटेच्या सुरुवातीला एकदमच लागलेल्या टाळेबंदीमुळे मास्कची कमतरता जाणवू लागली होती म्हणूनच प्रशासनाने कापडी मास्क वापरण्याबद्दलही सांगितलं. आपल्या नाका-तोंडातील जीवाणू-विषाणू आजबाजूच्या हवेत पसरू नयेत, यासाठी हा मास्क वापरण्यास सांगितला होता. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून कापडी मास्क वापरावा हे कारण दिले गेले नव्हते. ओमायक्रॉन हा आधीच्या उपप्रकारापासून ७० पट अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे हा मास्क वापरणे फायदेशीर ठरू शकत नाही.

सर्जिकल मास्क वापरला तर चालतो का?

जरी हे सर्जिकल मास्क कापडी मास्क पेक्षा हलके असतील तरी सुद्धा हे मास्क वापरणं, चांगलं आहे, कारण श्वसनमार्गाद्वारे आत येणाऱ्या जीवजंतूना या मास्कमुळे अटकाव होतो. परंतु या मास्कमुळे सर्वतोपरी सुरक्षा मिळेलच असं नाही. हे मास्क धुवून वापरता येत नाहीत. त्यामुळे एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरता येत नाहीत. दरवेळी नवीन मास्कच वापरावा लागतो. बस, रेल्वे यांतून प्रवास करताना किंवा बंदिस्त ठिकाणी असताना याहीपेक्षा अधिक संरक्षण देणारे मास्क वापरणं गरजेचं आहे.

एफएफपी मास्क वापरणं कितपत योग्य?

एफएफपी मास्क म्हणजे नक्की कोणता मास्क? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडू शकतो. याचा अर्थ फिल्टरिंग फेसपीस मास्क (Filtering Facepiece Mask). हे मास्क निअॉश -NIOSH म्हणजेच National Institute for Occupational Safety and Health या अमेरिकी संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त असतात. यामध्ये बहुतांश वापरला जाणारी मालिका म्हणजे KN95S. त्याचबरोबर DL2, DL3, DS2, DS3, FFP1,2 आणि FFP3, KN100, KP95, KP100, P2, P3, PFF2, PFF3, R95 हे ही अन्य प्रकार असतात. हे मास्क सेल्युलोज किंवा प्लास्टिक सारख्या पदार्थांपासून बनवले जातात, म्हणून हे मास्क टणक असतात.

एफएफपी मास्कचे प्रकार –

एफएफपी १ – हे मास्क घातल्याने धुलीकणांपासून आपले संरक्षण होते. म्हणून मोठ्या कारखान्यांमध्ये या मास्कचा वापर केला जातो. हे मास्क घातल्यामुळे हवेतील ८०% गोष्टींपासून आपले रक्षण होते. सर्जिकल मास्कपेक्षा हे मास्क प्रभावशाली ठरतात. परंतु विषाणूंपासून हे मास्क आपला बचाव करू शकत नाहीत.

एफएफपी २ – हे मास्क एन९५ प्रकारच्या मास्कसारखेच असतात. या मुळे हवेत तरंगणाऱ्या ९५% घटकांपासून आपला बचाव होतो. या प्रकाराचे केएन ९५ आणि पी २ असे उपप्रकार पडतात. हे मास्क घातल्याने विषाणू संसर्गापासून आपलं रक्षण होतं.

एफएफपी ३ – हे मास्क सर्वात शक्तीशाली मास्क समजले जातात. हे मास्क वापरल्यामुळे हवेतील ९९% घटक गाळून घेतले जातात. यामुळे एस्बेटॉस, सेरॅमिक यासारखे छोट्यातले छोटे कण त्याचबरोबर विषाणू- जीवाणू नाकात जाऊ शकत नाहीत. याला आपल्या एन-९९ या नावानेही ओळखले जाते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole