Google मध्ये नोकरी करायची आहे? खुद्द गुगलमधील भारतीय इंजिनिअरनं सांगितला अनुभव; एकदा वाचाच

आपले पालक आपल्या पाल्याला सुयोग्य व उच्चतम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पाल्याने चांगल्यातल्या महाविद्यालयातून त्याने पदवी घ्यावी आणि मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवावी, असं पालकांचं स्वप्न असणं अगदीच सहाजिक आहे. असंच स्वतःच आणि आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या व्यक्तीबद्दल. या लेखात जाणून घेऊयात की जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Google मध्ये नोकरी कशी मिळवली.

जगातील नावाजलेल्या व मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून आपली कारकीर्द (Career) घडवण्याची बहुतांश लोकांची इच्छा असते. गूगल ही अशीच एक कंपनी आहे. गूगल मध्ये नोकरी करणं (Jobs in a Google) हे खरंच स्वप्नवत आहे. आकाश मुखर्जी हे गूगलमध्ये नोकरी करतात. येथे सेक्युरिटी इंजिनीअर (Security Engineer) या पदावर ते कार्यरत आहेत. त्यांनी Google मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या भारतीय युवकांना याबद्दल सांगितलं आहे.

Google मध्ये कसं असतं कामाचं स्वरूप?

मुखर्जी यांनी Google मधील स्वतःच्या कामाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ” टूल्सचं डिझायनिग करणे व त्यानंतर टूल्स तयार करणे हे काम माझ्याकडे आहे. यासाठी डिझाइन डॉक्स व त्यासोबतच कोडिंगही करावं लागतं. चालू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलचा आढावा घेणं यासाठी मला १० – २०% वेळ हा खर्ची घालावा लागतो. अनेक मोठ्या प्रकल्पांवर मला काम करायला मिळतं, त्यामुळं कायम आव्हानात्मक वातावरण व काम करत राहण्याची वृत्ती माझ्यात तयार होत असते.

Google मध्ये काम करण्याचा फायदा काय?

ज्या सर्च इंजिनसह अन्य अ‍ॅप्लिकेशन्स (Google apps) चा जगात सर्वाधिक वापर होतो त्यात Google च वरच्या क्रमांकावर आहे. म्हणजे Google शी रोजच करोडो लोक जोडले जातात. मुखर्जींना वाटतं की त्यांनी केलेलं काम ज्याच्यामुळे करोडो लोकांचं आयुष्य सहज होतं.. हीच प्रेरणादायी भावना असल्याचं ते सांगतात. आमची सहकार्याने पार पडतात, त्यामुळे जसं काम महत्वाचं आहे तसेच सहकारी. त्यांच्या विना हे काम आटोपणं शक्य नाही.

Google मधील मुलाखतीची तयारी कशाप्रकारे करावी?

Google मध्ये नोकरी मिळवण्यासाठी महत्वाचा टप्पा मुलाखतच असतो. Google ची मुलाखत ही मुख्यतः उमेदवाराच्या मूलभूत ज्ञानाची परीक्षा असते. मूलभूत संकल्पनांची जबरदस्त तयारी केलेली असावी. तसेच तांत्रिक ज्ञानाची चाचणीही असल्यामुळे त्याचा ही अभ्यास हवाच. जास्तीत जास्त प्रश्न हे मूलभूत ज्ञानावर आधारित असल्यामुळे हे ज्ञान महत्वपूर्ण आहे हे लक्षात येतं. अभ्यासही त्याचप्रमाणे करावा लागतो.

आत्मविश्वास महत्वाचा

आपल्याला कोणत्याही सर्वोच्च ठिकाणी जायचं आहे, किंवा खूप मोठं यश संपादन करायचं आहे. तेंव्हा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आत्मविश्वास. काळ अनुकूल असो की प्रतिकूल, पदरात यश पडो अपयश. आत्मविश्वास अढळच असायला हवा. अपयशापेक्षा त्याबद्दलचं वाटणारं भय मोठं असतं.. त्याला पराभूत करता यायला हवं. अपयशाला संधी म्हणून पहायला हवं. कारण तेंव्हा आत्मपरीक्षण करून त्रुटीं मात करण्यासाठीची व नवीन शिकण्याची संधी येते. कायम सकारात्मक ऊर्जेने भारलेले रहा.


1 Comment
  1. Vaibhav Bari says

    I LIKE GOOGLE AND YOUR BENIFITS

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.