12वी उत्तीर्णांनो, जॉबची संधी सोडू नका; पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिपाई (Peon) – एकूण जागा 12

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिपाई (Peon) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना बेसिक इंग्लिश भाषा वाचता येणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवार हे त्या जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे वयवर्षे 18 ते 28 च्या दरम्यान असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

Punjab National Bank Recruitment 2022 अर्ज करण्यासाठीचा पत्ता

मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.


सरकारी जॉब संधी –

3 Comments
  1. Nagesh Aghav says

    Job

  2. Nagesh Aghav says

    Areas

  3. Harsh says

    H

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole