नाटो संघटना काय आहे?

आज जवळपास ४० पेक्षा जास्त दिवस होऊन गेले आहेत, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) थांबायचं नाव घेत नाही. रशियाची नौसेना, वायुसेना आणि लष्कर हे युक्रेनमध्ये नुसता धुमाकूळ घालत आहेत. या दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे ती नाटो संघटना (NATO). काय आहे ही संघटना? जाणून घेऊयात,

नाटो संघटना –

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (North Atlantic Treaty Organization) हे संपूर्ण नाव असणाऱ्या संघटनेचं संक्षिप्त रूप म्हणजे ‘नाटो’. उत्तर अमेरिका खंडातील आणि युरोपातील देश यांनी एकत्र येऊन जी लष्करी संघटना उभी ती ही नाटो. दुसऱ्या महायुद्धानंतर ४ एप्रिल १९४९ रोजी नाटो संघटना स्थापन झाली. स्थापनेच्या वेळी अमेरिका व अन्य युरोपिअन देश असे एकूण १२ देश या संघटनेचे सदस्य होते. आज एकूण ३० देश नाटोचे सदस्य आहेत. बेल्जियममधील ब्रुसेल्स (Brussels, Belgium) मध्ये नाटोचं मुख्यालय आहे. नाटो देश आणि त्या देशातील सर्व नागरिकांच्या संरक्षणाची हमी देणे ही नाटो ची जबाबदारी आहे. कोणत्याही एका सदस्य राष्ट्रावर आक्रमण म्हणजे संपूर्ण नाटोवर आक्रमण असा या सदस्यांमध्ये करार आहे.

अमेरिका आणि युरोपियन देशांकडून नाटोची स्थापना

दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाला (Cold War) सुरुवात झाली. जग अमेरिका आणि सोव्हिएट रशिया (America and Soviet Russia) अशा दोन गटांत विभागलं गेलं. कारण दोघांनाही संपूर्ण विश्वावर सत्ता गाजवायची होती आणि म्हणूनच नाटोची स्थापना केली गेली. अमेरिकेच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या संघटनेत सुरुवातीला बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, ग्रेट ब्रिटन या देशांनी (European Countries) मिळून नाटो ही संघटना बनवली.

ज्याचा मुख्य हेतू सोव्हिएट रशियाच्या विरोधात लष्करी एकत्रीकरण हा होता. सोव्हिएट युनियनने आता हळू हळू आपले हात पाय पसरायला सुरुवात केली जे देश महायुद्धात कमजोर झाले होते त्यांना आपल्या अंकित करावं अशी रशियाची इच्छा होती. काळ्या समुद्रातून होणाऱ्या जागतिक व्यापारावर नियंत्रण मिळावावं म्हणून ग्रीस आणि टर्कीवर रशियाला सत्ता गाजवण्याचा हेतू होता. आपल्या सीमा वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोव्हिएट युनियनच्या या हालचालींमुळे अमेरिका आणि युरोपीय देश यांचं सोव्हिएट बरोबर शांततापूर्ण संबंध बिघडले. आणि सोव्हिएट रशियाला आवर घालण्यासाठी या सर्वांनी नाटोची स्थापना केली.

नाटोच्या करारातील ते महत्वाचं कलम

नाटो राष्ट्रांनी स्थापनेच्या निमित्ताने एक करार केला जो लष्करी ऐक्याशी संबंधित आहे. त्यातील कलम पाच हे फार महत्वाचं म्हणजे या कराराचं मूळ (NATO Treaty Article No. 5) आहे. नाटोतील सदस्य देश सर्वांचे एकत्रित रक्षण करण्याचा हेतू ठेवून नाटोमध्ये आले आहेत. म्हणजे कोणत्याही एका सदस्य देशावर झालेलं आक्रमण म्हणजे सर्व नाटो राष्ट्रावर आक्रमण असा त्याचा अर्थ आहे. आजवर वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने आणि नाटो राष्ट्रांनी मिळून तालिबानविरोधात जोरदार हल्ले केले आणि २० वर्षे हे युद्ध चालू होतं.

रशियाने ही उघडली आघाडी

आपल्या विरोधातील नाटो ही उघडलेली आघाडी बघून सोव्हिएट युनियनने ही वॉर्सा करार १४ मे १९५५ (Warsaw Treaty) रोजी स्थापन केला. यामध्ये अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, रोमानिया हे देश सोव्हिएट युनियनच्या नेतृत्वात सामील झाले. हा जुलै १९९१ पर्यंत होता, पुढं सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि हा करार संपला.

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटण्यामागचं कारण

सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर नाटो संघटना अधिक बळ मिळवू लागली. आणि पूर्वी जे देश सोव्हिएट युनियनचा भाग होते, म्हणजे एस्टोनिया, लिथुआनिया आणि लाटाविया या देशांना नाटोनेआहे २००४ मध्ये आपलं सदस्यत्व दिलं. हे देश रशियाला अगदीच लागून आहेत. आता युक्रेनही रशियाच्या सीमेवरच आहे. युक्रेन व रशियाच्या सीमेची एकूण लांबी २२०० किमी आहे. युक्रेनलाही नाटोचा सदस्य व्हायची इच्छा होती.

मध्यंतरी अमेरिकेनेही त्याला या मुद्द्यावर खूप आश्वासने दिली आणि नाटोमध्ये सामील होण्यास सांगितलं. महासत्तेच्या खुर्चीवर स्वतःला बसायला मिळावं म्हणून अमेरिका रशियाला घेरत आहे. आता युक्रेन जर नाटोचा सदस्य झाला तर नाटो सैन्य रशियाच्या उंबरठ्यावर येऊन बसेल, ही रशियाची भीती आहे. कारण रशियाची राजधानी या सीमेपासून पासून फक्त ६५० किमीवर आहे, युक्रेनने नाटोचा सदस्य होऊ नये, हे रशियाला हवं आहे.

१९९० मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर नाटोने पहिली लष्करी मोहीम सुरू केली. ऑपरेशन अँकर गार्ड असं त्याचं नाव होतं. याच्या माध्यमातून तुर्कीवर हल्ला होऊ नये यासाठी नाटोची लढाऊ विमाने तेथे ठेवण्यात आली होती.

१९९१ साली इराक-कुवैत युद्धामुळेच केलेले हे दुसरे ऑपरेशन. ऑपरेशन जॉइंट गार्ड. तुर्कस्तान मध्येच नाटोचे मोबाईल फोर्स आणि हवाई संरक्षण तैनात केले गेले. नाटोचे दबावातंत्राला यश आल्यामुळे काही महिन्यांनी फेब्रुवारी १९९१ मध्ये कुवेत इराकच्या ताब्यातून मुक्त झाला.

पण रशियाच्याविरोधात युक्रेनच्या मदतीला नाटो येऊ शकत नाही. पण नाटो सदस्यांनी बाहेरून बरीच मदत युक्रेनला केली. तोवर बलाढ्य राशियापुढे युक्रेन उध्वस्त झाला आहे. या युद्धाला कधी पूर्णविराम मिळतो हे येणारा काळच सांगेल.


हे वाचलंत का?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.