ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. गृह मंत्रालयात विविध पदांची भरती

MHA Recruitment 2022

MHA Recruitment 2022 – गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा : 37

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 02
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे.

२) कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 02
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवारांकडे पाच वर्षांच्या सरावासह कायद्याची पदवी असावी. तसेच संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असावे.

३) प्रशासकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : 
समतुल्य शासकीय पदावरून निवृत्त झालेले असावे. प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचाही अनुभव असावा.

४) मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 03
शैक्षणिक पात्रता :
 महसूल/मालमत्ता प्रकरणांमध्ये अनुभव असलेले DS किंवा US.

५) पर्यवेक्षक/सल्लागार – 03
शैक्षणिक पात्रता : 
MBA/BBA. तसेच, एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान असावे.

६) सर्वेक्षक – 26
शैक्षणिक पात्रता :
 १२वी विज्ञान प्रवाह (गणित हा विषय असावा) ६०% गुणांसह.

वयोमर्यादा: ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे

इतका मिळणार पगार

कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) – 35,000/- रुपये प्रतिमहिना
प्रशासकीय अधिकारी – 45,000/- रुपये प्रतिमहिना
मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार – 60,000/- रुपये प्रतिमहिना
पर्यवेक्षक/सल्लागार – 40,000/- रुपये प्रतिमहिना
सर्वेक्षक – 25,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 24 जून 2022

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

1 Comment
  1. SHIVNATH BABURAO GARJE says

    सर्वेक्षण

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole