विवाह नंतर व्यक्ती जाड का होतात?

लग्न ही आयुष्यातील महत्वाची घटना आहे. या घटनेनंतर आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलतात. महिलांच्या बाबतीत तर ओळखही बदलून जाते. आपल्या शारीरिक ठेवणीमध्येही खूप बदल घडून येतात. लग्न झालेल्या बऱ्याच व्यक्तीचं वजन वाढल्याचं दिसून येतं. याचा परिणाम स्त्रियांच्या बाबतीत थोडा अधिक प्रमाणात दिसतो. याचं कारण काय असावं? तर समाजात अशी मान्यता आहे की शारीरिक संबंध (weight increases due to Sex) आल्यामुळे वजनात वाढ होते. यांचं एकमेकांशी खरंच काही नातं आहे का? तर नाही हा चुकीचा समज रूढ झाला आहे. मग यात नक्की काय आहे? जाणून घेऊयात.

अमेरिकेतील राष्ट्रीय औषध अभ्यासिका (National Library of Medicine, USA) यांच्या अभ्यासानुसार असं संशोधन समोर आलं की वजन वाढण्याशी शरीर संबंधाचा काहीही संबंध नाही. वजन वाढतं ते लैंगिक संप्रेरकांमुळे (Sex hormones). जेव्हा या लैंगिक संप्रेरकांचा शरीरात असमतोल होतो तेव्हा वजन वाढते. खरंतर लैंगिक संबंध हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे.  सहाजिकच कोणत्याही व्यायामामुळे आपला घाम निघतो. अनावश्यक वजन कमी होण्यास मदत होते. आता विवाहानंतर केवळ स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही या वजन वाढीला सामोरं जावं लागतं. त्याची वेगवेगळी कारणं आहेत.

संप्रेरकांचा असमतोल

तणाव, अनुवंशिकता, खान-पान, धकाधकीचे दैनंदिन वेळापत्रक, लैंगिक संप्रेरके, गर्भाशयावर गाठी होण्याचा विकार अशी संप्रेरकांचा असमतोल होण्याची विविध कारणे आहेत. यात आपण लैंगिक संप्रेरकांविषयी थोडी माहिती घेऊया. 

१) DHEA – 

डीहायड्रोएपिअॅन्ड्रोस्टेरॉन/Dehydroepiandrosterone हे अॅड्रेनल ग्रंथीमधून स्त्रवलं जातं. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन सारखी संप्रेरके याच DHEA संप्रेरकामुळेच तयार होतात. याच्या समतोल बिघडला की वजनवाढ होते. 

२) इस्ट्रोजेन – 

याला स्त्री संप्रेरक (Female Hormone) म्हणतात. यामुळेच महिलांचे स्तन, अंडाशय, गर्भाशय सारखे  प्रजनन संस्थेतील अवयव विकसित करणे आणि त्यांना उतारवयापर्यंत नीट संभाळणे हे या संप्रेरकाचे महत्वाचे काम आहे. याची पातळी तर बऱ्याच वर खाली होते. त्याचे शरीरावर बरेच नकारात्मक परिणाम होतात. त्यातलाच जाडी वाढणे हा आहे. 

३) प्रोजेस्टेरॉन

हे अंडाशयामध्ये स्त्रवलं जातं, आणि गरोदरपणात याचा विशेष सहभाग असतो. मासिक पाळीच्या प्रक्रियेमध्येही बीजांडे विकास करण्याचं काम हे करतं. हे खूप महत्वाचं संप्रेरक आहे. याच्या पातळीतील बदलामुळे वजन वाढ होत राहते.  

४) हार्मोन्स असंतुलनाची लक्षणं

यामुळे कळून येतं की संप्रेरकांची पातळी वर खाली झाली आहे.  

  • मांड्या, नितंब या भागांमध्ये मेदाची साठवणूक होते. 
  • मासिक पाळी लवकर किंवा उशीरा येते.
  • शरीरातून तप्त वाफा येणे.
  • योनीमार्ग शुष्क होणे.
  • निद्रानाश होणं
  • विचित्र मानसिक स्थिती होणे. 
  • शारीरिक संबंध कमी वेळेचा होणे
  • निराशा
  • दिनक्रमातील अचानक झालेले बदल

म्हणून चुकीचे समज ठेवून वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष न करता महिलांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole