अमेरिकेतील लशी अजूनही भारतात का आलेल्या नाहीत ? नेमकी अडचण काय ?

भारतात सध्या भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सीन’ आणि सिरमची ‘कोव्हीशील्ड’ अश्या २ व्हॅक्सिन दिल्या जात आहे. वर्षाच्या सुरवातीला जानेवारीपासूनच भारतीयांना लस देण्याची सुरवात करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ ह्या लसीला भारतात वापराची परवानगी मिळाली आहे. लवकरच भारतीयांना हि लस देण्यात येईल. परंतु अमेरिकेतील फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन ह्या लसींना भारतात वापराची परवानगी का मिळालेली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो ?

अमेरिकेतील लस अजूनही भारतात का आलेली नाही ?

एका वृत्तानुसार, मॉडर्ना (Moderna) ह्या कंपनीच्या लशींचे पुरेसे डोज तयार नसल्याने ती भारतात सध्या तरी येऊ शकत नाही परंतु सिप्ला ह्या भारतीय कंपनीने आधीच ५ कोटी डोज ऑर्डर करून ठेवलेले आहेत.

फायझर (Pfizer) सुद्धा आपली लस भारताला द्यायला तयार आहे परंतु काही कायदेशीर अडचणींमुळे हि प्रक्रिया थांबली असून भारतात लस पाठवण्याचा अर्जही कंपनीने मागे घेतला आहे.

या व्यतिरिक्त अमेरिकन कंपन्या भारत सरकारला ‘लसींचे साईड इफेक्ट्स झाल्यास कंपनीवर कोणतीही कारवाई होणार नाही’, अशी हमी मागितली आहे. भारताने अजूनतरी अशी कोणतीही हमी अमेरिकन कंपन्यांना दिलेली नाही.

भारत सरकारने अमेरिकन कंपन्यांना सर्व मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे परंतु कोणत्याही अमेरिकन कंपनीचा भारतात लस पुरवण्यासाठी सरकारकडे अर्ज आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole