WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, एक चूक आणू शकते अडचणीत

काही गोष्टी अनावधानाने WhatsApp वरून आपल्याकडून घडतात आणि हि एक चूक आपल्याला आणू शकते अडचणीत.

दहाएक वर्षे झाली व्हॉट्सअ‍ॅप (Whats app) हा जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. रोज किमान एकदातरी फेसबुक- व्हॉट्सअ‍ॅप उघडल्याशिवाय आपला दिवस जात नाही. ही सहज संदेशवहन करणारं अ‍ॅप आपल्या खूप सवयीचं झालं आहे. आता केवळ संदेशच नाहीतर फोटोज्, व्हिडिओज्, डॉक्युमेंट्स असं सगळं व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येतं, जवळच्यांची आठवण आली लगेच व्हिडिओ कॉल करून बोलू शकतो. हे आपल्याला माहीत आहे. पण काही गोष्टी अनावधानाने व्हॉट्सअ‍ॅपवरून आपल्याकडून घडतात.     

WhatsApp वर या गोष्टी टाळा –

बऱ्याच वेळा आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स मध्ये बरेच  मेसेजेस् येत असतात. ज्यांत नवनवीन माहिती, सरकारी योजना इ. बऱ्याच गोष्टी असतात. आलेल्या या मेसेजेस् ची सत्यासत्यता तपासून न बघताच ते असेच फॉरवर्ड करण्याचं काम मन लावून लोक करतात. पैसे गुंतवण्याबद्दल काही मेसेजेस् असतात, ज्यात आकर्षक योजना असतात. काही ऑफर्स असतात. या ठिकाणी क्लीक करून आपल्याला माहिती भरायला सांगितली आटे आणि अजून १० ठिकाणी पाठवा असं सांगितलं जातं. जर असे मेसेजेस् पसरवले गेले जर कुणी मेसेजमध्ये दिलेल्या ठिकाणी आपली माहिती भरली तर ती व्यक्ती आर्थिक लुबाडणुकीची बळी ठरू शकते. त्याचं बँकखातं ही रिकामं होऊ शकतं. बहुतेक वेळा या अशा प्रकारच्या हॅकर्स च्या जाळ्यात अडकलेली उदाहरणे आपल्या आसपासच असतील.      

व्हॉट्सअ‍ॅपवर धार्मिक द्वेषभावना तयार होईल असे मेसेजेस् पाठवू नयेत. एखाद्या विशिष्ट धर्मस्थळाबद्दलचा द्वेष वाढवणारे संदेश किंवा आलेले मेसेजेस् फॉरवर्डही करू नयेत. संवेदनशील विषयांवर आधारित खोट्या बातम्या असलेले मेसेजेस् पसरवणे, तसेच खोटे फोटो, व्हिडिओ पाठवणे; फॉरवर्ड करणे. हे द्वेषकारक मेसेजेस् वाचून शांतता भंग पावू शकते, दंगल हिंसाचार होऊ शकतो किंवा त्याला प्रोत्साहन मिळू शकतं व  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे केल्यास अटक होऊ शकते.     

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेजेस् तसेच धमक्यांचे मेसेजेस् पाठवू नयेत. बनावट/फेक अकाऊंट बनवून कुणाला त्रास देण्याचा उद्योग करू नये. फेक अकाऊंट काढणं त्याचा गैरवापर करणं. हा गुन्हा आहे. यांमुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते. 

फेक वेबसाईट कशी ओळखाल ? 

आपल्याकडे ज्या वेबसाईटच्या लिंक येतात त्या मुळात खऱ्या आहेत की नाहीत हे समजण्यासाठी काय करावं? तर वेबसाईटची सुरुवात http:// ने आहे की https:// ने आहे, जर https:// ने सुरू होणारी लिंक असेल तरच त्यावर क्लीक करून ती उघडावी. त्याचबरोबरीने याचा शेवट कसा असायला हवा? तर कोणतीही व्यापराशी संबंधित वेबसाईट असेल तर तिचा शेवट .com असेल, संस्थेशी संबंधित असेल तर .org, भारतीय वेबसाईट असेल तर .in, शासकीय वेबसाईट असेल तर .gov.in आणि शिक्षणक्षेत्राची संबंधित असेल .edu असं लिहिलं असेल तरच त्या वेबसाईट उघडाव्यात.   

अज्ञानामुळे चुका होऊ शकतात पण या चुका अपराध म्हणून गणल्या जातात यासाठी ही माहिती जनहितार्थ जारी करणं हे कर्तव्य आहे. ते आम्ही चोखपणे बजावणार.


1 Comment
  1. Ujwal thakre says

    Thank you khup kahi shikayla midte tumchya kdun

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole