UPSC Pre 2020 साठी जाण्याआधी आयोगाने दिलेल्या सूचना वाचल्या का ?

Civil Services (Preliminary) Examination, 2020 ची परीक्षा रविवार, ४ ऑक्टोबर २०२० ला होत आहे. परीक्षा पूर्णपणे सुरक्षित वातावरणात होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्ण तयारी तयारी करत कंबर कसली आहे. परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने सर्वसाधारण सूचनेसोबतच कोरोनाच्या पार्शवभूमीवर इतर सूचना सुद्धा दिल्या आहेत त्या खालील प्रमाणे.

UPSC Pre 2020 साठी लागणारे प्रवेशपत्र सोबत आणणे, त्यावर दिलेल्या ओळखपत्राची प्रत आणि ओरिजनल ओळखपत्र सोबत ठेवणे असा सल्ला आयोगाने दिला आहे.

परीक्षा हॉल मधील प्रवेश परीक्षेच्या १० मिनिटे आधी बंद करण्यात येणार आहे. पहिला पेपर ९. ३० ला चालू होणार आहे म्हणजेच हॉल मधील प्रवेश ९ वाचून २० मिनिटांनी बंद होईल त्यामुळे योग्य वेळेत हॉल मध्ये जाणे गरजेचे आहे.

UPSC ने दिलेल्या e-Admit Card वरील केंद्राशिवाय इतर कोणत्याही केंद्रात परीक्षा देता येणार नाही. तसेच केंद्रावर दिलेल्या विविध सूचना देखील वाचण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे.

mobile phone परीक्षा केंद्राजवळ बंद करून ठेवणे आवश्यक आहे. इत्तर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्राच्या आसपास आणणे पूर्णपणे बंदी असणार आहे. जे विद्यार्थी स्मार्ट घड्याळ वापरतात त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. फक्त simple wrist watches चालतील असं आयोगाने स्प्ष्टपणे सांगितले आहे.

ज्यांचा ऍडमिट कार्ड वर स्पष्ट फोटो नाही त्यांनी अजून एक ओळखपत्र आणि २ पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्रात विद्यर्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे तर ओळख पटवण्यासाठी मास्क काढावा लागेल असाही आयोगाने सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर सोबत सॅनिटायझर hand sanitizer (small size) आणण्यासाठी परवानगी आहे पण ती बॉटल ट्रान्सपरंट असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात ‘social distancing’ आणि ‘personal hygiene पाळणे गरजेचे आहे.

शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole