कायम तारुण्याचा आनंद घेण्यासाठी प्या विविध हर्बल टी…जाणून घ्या हर्बल टी आरोग्यासाठी आहे चांगला..

हल्लीच्या काळात अकाली म्हातारपण येण्याचा प्रकार वाढला आहे. हवामान, प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम होऊन वृद्धत्वाची (old age  problem) झलक दिसू लागते. त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात. स्वतःतले हे बदल पाहून अस्वस्थ व्हायला होतं आणि म्हणून खर्चिक उपाय योजना करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. अकारण खूप खर्च करण्यापेक्षा घरगुती उपाय केल्यामुळे या समस्येचं समाधान मिळेल. कसं काय तर ज्या गोष्टीचे आपल्यापैकी बहुतांश जण तलफी असतात ती गोष्ट म्हणजे चहा.  पण हा अमृततुल्य प्रकारचा चहा असतो. यामुळे केवळ कही काळासाठी जरा तरतरी येते, परंतु याशिवाय फार काही होत नाही. मग चहाने अजून काय होणं अपेक्षित आहे? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चहा पिण्याचे बरेच फायदे आहेत. पण त्यासाठी आपला नेहमीचा कडक चहा नाही तर हा खास असा हर्बल टी (herbal tea keeping young). याचे वेगवेगळे प्रकार आणि फायदे जाणून घ्यायचे आहेत.

इतक्या विविध प्रकारात उपलब्ध आहे हर्बल टी 

तारुण्य टिकवण्याचा हा उपाय असणाऱ्या या हर्बल टी हा खूप प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

१. रुईबोस टी (Rooibos Tea)

रुईबोस चहा सामान्यतः काळ्या चहा प्रमाणेच तयार केला जातो. कधीकधी दूध, लिंबू किंवा मध घालून बनवला जातो.  लॅट्स , कॅपुचिनो किंवा आइस्ड टी म्हणून देखील प्यायला जातो हा खास करून अफ्रिकेच्या दक्षिण भागात यांची झाडं आढळतात. हा कॅफेनमुक्त असून यात टॅनिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं. म्हणून त्वचेकरता रुईबोस टी खूप चांगला असतो.

२. ओलोंग टी (Oolong Tea) 

हा पारंपारिक चायनीज चहा आहे व रंगाने फिका असतो.  यांतही जीवनसत्वे, खनिजे आणि काही फायदेशीर ठरणारी ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. यामुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते.

३. माचा टी (Matcha Tea)

हिरव्या चहाच्या पानांची बारीक दळलेली पूड असते, तिला माचा असं नाव दिलं आहे. पूर्व आशियातील काही भागांमध्ये याचं सेवन करण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेचा उदय जपानमध्ये झाला असं मानण्यात येतं. यासाठी चीनमध्ये खास बाऊल असे, ज्यातून माचा टी पीत असत, त्याला चावन असं नाव होतं. याचा औषधी म्हणून वापर होतो. 

४. टर्मरिक टी (Turmeric Tea) 

हळद आपल्यासाठी खूपच परिचयाची आहे आणि सवयीची आहे. जखम भरून येण्यासाठी, सुजेवर आराम मिळावा म्हणून हळदीचा उपयोग होतो. कारण हळदीमध्ये असणारा कर्क्युमीन (Curcumin) हा मुख्य घटक आहे. या कर्क्युमीनमुळेच हळदीला औषधी गुणधर्म मिळाले आहेत. ज्याप्रमाणे हळद दुध पितो. तसाच हा हळदीचा चहा असतो. याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. संधीवाताचा त्रास असेल तर आराम मिळतो. कर्करोगातही हा चहा लाभदायक ठरतो.  

५. ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी हा प्रकार आता बराच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला आहे. ग्रीन टी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकण्यासाठी, शरीरशुद्धी होण्यासाठी मदत होते. म्हणून ग्रीन टी खूप फायदेशीर आहे. 

हर्बल टी पिण्याचे फायदे (Benefits of Herbal tea)

1. कॅटेचिन्स, पाॅलीफेनल आणि फ्लेवोनाॅइड सारखे ॲण्टिऑक्सिडण्ट्स या हर्बल टी मध्ये असतात. या ॲण्टिऑक्सिडण्ट्स मध्येच औषधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेच्या पेशींचे ऑक्सिडीकरण म्हणजेच फ्री रॅडीकल्स मुळे घटक सूर्यकिरणांमुळे होणारी पेशींची हानी टाळण्यास मदत होते. हे फ्री रॅडीकल्सच त्वचेचा तजेलदारपणा घालवतात. त्यामुळे हर्बल टी हे नुकसान थांबवता येते. अकाली म्हातारपण येत नाही. 

2. पचनसंस्थेच्या काही छोट्या मोठ्या विकाराचा समान करावा लागला तर या हर्बल ती मुळे फायदा होतो. टर्पेनाॅइड्स व फ्लेवोनाॅइड्स सारखे औषधी घटक दाह, ज्वर, निद्रानाश यावर गुणकारी ठरतात. उत्तम पचनासाठी हर्बल टी चं जरूर सेवन करावं.

3. तांबं, मॅगनीज, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम शरीराच्या जडणघडणीत उपयोगी असणारी खनिजे या हर्बल टी मध्ये असतात. उतारवयात जेव्हा हाडांमध्ये, सांध्यांमध्ये खूप वेदना होतात, तेव्हा हर्बल टी आवर्जून प्यावा. कारण हाडांच्या घनतेत वाढ होणं, वेदना कमी होऊन हाडांना बळकटी येणं यासाठी हर्बल टी द्वारे या खनिजांचं सेवन केलं जावं. 

4. या हर्बल टी मध्ये फ्लेवोनाॅइड्स, पाॅलीफेनाॅल्स यासारखे महत्वाचे घटक असतात. ज्याला रासायनिक भाषेत फायटोकेमिकल्स म्हणतात. या फायटोकेमिकल्समुळे आपल्या प्रतिकारकक्षमतेला चालना मिळते आणि रोगकारक जीवजंतूंचा नयनाट करण्यास मदत होते.

5. आपण रोजचा जो चहा पितो त्यात कॅफीन नावाचा पदार्थ असतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तसेच चिंताग्रस्तपणा, निद्रानाश असा त्रास होतो. म्हणूनच याला पर्याय म्हणून हर्बल टी प्यावा. खरंतर दिवसाची सुरुवातच या हर्बल टी ने करायला हवी. आपलं आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत करेल.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole