फक्त १० रुपयांत मिळेल चमकदार त्वचा, शुगर स्क्रबच्या मदतीने; तेही घरच्या घरी

त्वचेचे सौंदर्य जपण्याकडे बहुतांश लोक लक्ष देतात तर काही त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, त्वचा निस्तेज, डल दिसू लागते. त्यावेळी काय करावं हा मोठा प्रश्न उभा राहतो. मग आपण ब्युटी पार्लरला जातो आणि विविध उपाय करतो. पण हे करणं खर्चिक असल्याने अनेकदा इच्छा होत नाही. पण आता तुम्ही घरात बसूनच फक्त १०  मिनिटांत आणि तेही फक्त १०  रुपयांत घरच्या घरी चमकदार आणि उजळ त्वचा मिळवू शकाल. त्याचं नाव आहे शुगर स्क्रब. (Sugar syrup scrub for shiny skin)

शुगर स्क्रब करा अन् फरक अनुभवा

शुगर स्क्रब तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येऊ शकतो. या स्क्रबच्या वापराने त्वचेवरील मृत पेशी (Dead skin cells) निघून जाते. त्यामुळे त्वचेचे टॅनिंग कमी होण्याबरोबरच त्वचा मुलायम होईल. 

असं तयार करा शुगर स्क्रब

शुगर स्क्रब आपण घरच्या घरी करू शकता. त्यासाठी एका वाटीमध्ये ग्रीन टीची पाने (Green tea leaves) घ्यावी. त्यामध्ये ऑलिव्ह आईल आणि साखर टाका. या मिश्रणाची पेस्ट तयार करा. तयार झालेल्या पेस्टने हलक्या हाताने मालिश करा. हे झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. 

अशी आहे दुसरी पद्धत…

शुगर स्क्रब तयार करण्याची दुसरी पद्धतही आहे. त्यामध्ये एका वाटीत साखर आणि लिंबाचा रस (lemon juice + sugar syrup) हे समप्रमाणात घ्यावा. त्यात एक चमचा मध टाका. तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि स्क्रब करावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. 

साखर आणि हळद (Sugar Syrup + Turmeric) हे दोन्ही एकत्र करून त्याची पावडर करून घ्यावी. यामध्ये गुलाब पाणी आणि पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि चेहऱ्यावर ५-७ मिनिटे मसाज करावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. ही पद्धत अत्यंत घरगुती आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole