संयमाचं फळ म्हणून सातव्या प्रयत्नात मिळालं यश. संयमी सुजय कदम यांचा यशस्वी प्रवास.

स्पर्धा परीक्षा देताना केवळ विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा? यश कसं मिळवता येतं? याबद्दलच मार्गदर्शन यशवंतांकडून मिळतंच पण यशापर्यंत जाण्याचा खडतर मार्ग आहे तरीही स्वतःला या मार्गावर सतत चालतं ठेवून यशाचं शिखर गाठण्यासाठी आतून खंबीर राहण्याबाबतचा कानमंत्र मिळणं ही तितकंच आवश्यक आहे कारण त्याशिवाय आत्मविश्वास वाढत नाही. तर अधिकारी होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी ही सुजय कदम यांची गोष्ट. (Success Story of Sujay Kadam)

अल्पकाळात पहिला टप्पा पार…

सुजय कदम हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील छोट्याश्या गावातून आलेले पण मुलगा हुशार म्हणून त्यांचे  वडील जवळच्याच गडहिंग्लज या तालुक्याच्या गावाला स्थायिक झाले. शालेय शिक्षण याच गावात पूर्ण करून सुजय पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. १२ वी विज्ञान शाखेतून पास झाल्यावर त्यांनी शासकीय महाविद्यालय औरंगाबाद मधून कॉम्प्युटर सायन्स मधून इंजिीअरिंगची पदवी घेतली. सुजय यांनी २०२० च्या परीक्षेत असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कॉ-ऑप सोसायटी (Assistant registrar of co-op societies) हे पद मिळवलं आहे.

पूर्व परीक्षेत चांगले मार्क मिळवायला काय करावं?

२०१५ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी केली. तीन महिन्याच्या अभ्यासावर सुजय यांनी संयुक्त पूर्वपरीक्षा (Combined Prelim) पास केली खरी पण इथूनच संघर्ष सुरू झाला. राज्यसेवा पुर्वपरीक्षेबद्दल बोलताना सुजय सांगतात की पूर्व परीक्षेचा आवाका खूप मोठा आहे. मुळात याचा अभ्यासक्रम कसा आहे हे समजून घ्यायला हवं. अभ्यासक्रमात खूपच कमी शब्दात माहिती आयोगाकडून देण्यात येते. म्हणून तयारी करतानाच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQ) सतत चाळून त्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण प्रश्न कसे टाकले जातात? त्यासाठी कोणत्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे याचा अभ्यास करणं, मागील ६ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.

अगदीच विषयानुसार बोलायचं असेल तर…

  • सामान्य विज्ञानामध्ये आम्ल – आम्लारी (Acid- Base), प्रकाश (Light), ध्वनी (Sound) यांवर वरचेवर प्रश्न येतात. यासाठी NCERT आणि राज्य परीक्षा मंडळ (state board) खास करून ९ वी १० वी ची पुस्तकं अभ्यासायला हवीत.
  • इतिहास विषयाचा अभ्यास करताना जास्त लक्ष हे राष्ट्रीय चळवळी, समाजसुधारक यांवर असायला हवं. इतिहासाचे जसे तीन भाग पडतात त्यानुसार वेगवेगळी पुस्तकं वापरावीत. प्राचीन इतिहास – ६वी ,११ वी स्टेट बोर्ड, मध्ययुगीन – ७ वी. या विषयांचा अभ्यास अभ्यासक्रम संक्षिप्त करायला हवा कारण वेळेत अभ्यास संपवता येतो आणि सराव जास्तीत जास्त वेळेस करायला मिळतो.
  • भूगोल अभ्यासताना खिंडी, चढता -उतरता क्रम,लोकसंख्येवर वारंवार प्रश्न येतात.
  • अर्थशास्त्रात शासकीय योजना, गरिबी, रोजगार…MDG, SDG यासारखे प्रश्न येतात.
  • चालू घडामोडीचा अभ्यास करताना परीक्षेच्या आधीचे वर्षभरातले मेगझीन्स रोज तासभर वाचायला हवीत.
  • CSAT: हा परिक्षेतला महत्वाचा भाग बनला आहे. कारण आता UPSC प्रमाणे यांत पात्र ठरणं गरजेचं असतं. आता यांत पात्र ठरण्यासाठी ६६ गुणांची आवश्यकता असते. रोज १ तास याची कसून तयारी करायला हवी.

भूगोलाची खास तयारी

भूगोलाचा अभ्यास करताना ४ थी ते १२ वी या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून प्रश्न येतात. म्हणून ती सगळी पुस्तके वाचायला हवीत. २०१९ पासून महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारले जात आहेत. त्यासाठी सवदी यांचं पुस्तक आणि ९ वी चं स्टेट बोर्ड – महाराष्ट्राच्या भूगोलासाठी पुरेशी आहेत. तसंच जागतिक आणि भारतीय भुगोलासाठी NCERT आणि स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचावीत.

मुख्यपरीक्षा पेपर १: 

मुख्यपरिक्षेची खास तयारी करायला लागते, असं सुजय यांनी सांगितलं. यांत पेपर १ मध्ये स्वातंत्र्योत्तर भारत महत्वाचा घटक आहे. यासाठी ११ वी NCERT – India after Independence हे फार उपयोगी पुस्तक आहे. सागर यांनी या पुस्तकाच्या शाॅर्ट नोट्स काढल्या. यावरून उत्तरलेखनाचा सराव केला. तसेच बिपीन चंद्रा यांचं पुस्तक आहे. हे ही उपयोगी आहे. अभ्यासक्रमातील घटक तपासावेत त्यानुसार अभ्यास कारण हे पुस्तक खूप मोठं आहे, असं सागर यांनी सांगितलं आहे. 

GS 2 – राजकीय पक्षांचा इतिहास हा घटक ही India after Independence मधून अभ्यासता येऊ शकेल. GS 1 आणि 2 साठी हे योग्य पुस्तक आहे. 

मुख्यपरीक्षा पेपर २ : 

पेपर २ बद्दल बोलताना सुजय सांगतात की यांत नवीन घटक आलेला आहे तो म्हणजे लोकप्रशासन व सार्वजनिक धोरण, हा घटक लक्ष्मीकांत (M. Laxmikanth) यांच्या Public Administration या पुस्तकातून काढून दिला आहे. लक्ष्मीकांत यांची तीन पुस्तकं Government हे core economy साठी Governance of India, Public Administration ही स्पर्धापरिक्षेसाठी उपयोगी आहेत. Public Administration च्या पुस्तकामध्ये ५०० -६०० MCQ दिलेले आहेत, ते अगदी तसेच्या तसे पेपरात येतात म्हणून त्यांचाच अभ्यास करावा.

Forest mains 

६ मुख्य परिक्षा आणि ३ मुलाखती यांत सागर यांनी वनसेवेच्या परिक्षेत चांगलीच मजल मारली होती. पण जेव्हा दोन परिक्षा एकाच वेळी म्हणजे राज्यसेवा आणि वनसेवेची मुख्य परीक्षा एकाच वेळी आल्यावर दोन्हींची तयारी कशी केली? हा प्रश्न पडतो.

याबद्दल सुजय यांनी सांगितलं की राज्यसेवा आणि वनसेवा यासाठी GS 1 चा पेपर यांत भरपूर सारखेपणा आढळतो. म्हणूनच वेगळी तयारी करण्याची गरज नाही. वनसेवा GS 2 मध्ये राज्यसेवा GS 1 चा कृषी आणि पर्यावरण ही सारखा आहे. राज्यसेवेचा अभ्यास करताना ७५% अभ्यासक्रम वनसेवेचा पूर्ण होतो‌. उरलेला  नेमराज सुन्दा यांच्या Competitive Agri पुस्तकातून करावा. राज्यसेवा मुख्यपरीक्षेनंतर ६० दिवसांनी वनसेवा मुख्यपरीक्षा थोडा वेळ मिळतो…

Combined Prelim मार्गदर्शन 

सुरुवातीलाच सांगितल्यानुसार सुजय यांनी फक्त तीनच महिन्यांच्या तयारीवर संयुक्त पूर्व परिक्षा उत्तीर्ण केली. याबद्दलची एक वेगळी रणनीती आखावी लागते असं सागर सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ही टी-20 सामन्यासारखी परिक्षा असते. एका तासात १०० प्रश्न सोडवायचे असतात. 

१५ प्रश्न गणिताचे असतात. यासाठी गणित चांगलं आहे किंवा नाही त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःची विभागणी करावी. 

दुसऱ्या की नंतर Combined चा Cut off ५५ च्या आसपास लागतो. म्हणून पेपर सोडवताना ४०-२० हे योग्य सूत्र वापरल्यामुळे यश मिळाल्याचं सागर यांनी सांगितलं. २० मिनिटे गणितासाठी (ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांनी) ४० मिनिटे बाकी ८५ प्रश्नांची उत्तरे मिळवावीत. याच्याउलट

४० मिनिटे गणितासाठी (ज्यांचं गणित चांगलं नाही त्यांनी) २० मिनिटे बाकी प्रश्नांना असं योग्य नियोजन करावं. महत्वाची गोष्ट प्रश्न एकदाच वाचावा….राज्यसेवा prelimचा फॉर्म्युला इथं लागू होत नाही, हे नीट लक्षात ठेवावं.

मुलाखतीची तयारी 

२०१७ पहिल्यांदा सुजय यांनी राज्यसेवा मुख्य परिक्षा पास केली पण मुलखतीची तयारी (Preparation of Interview) नीट केली नसल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून ३५ मार्कांनी पद हुकलं. २०१९ ला पुन्हा ते मुलाखतीला पात्र ठरले. मग पुण्याला जाऊन सुजय यांनी तयारी केली. विजय सवदे, सागर मनोरे यांच्या सोबत सामुहिक चर्चासत्र करण्यावर भर दिला. दैनंदिन चालू घडामोडी वर चर्चा केली. मुलाखतीची तयारी करताना आपल्याला छंद, आपल्या कॉलेजविषयी, जिल्ह्याविषयी किंवा आपण अतिरिक्त उपक्रम काही केलेत का? चालू घडामोडी असे महत्वपूर्ण प्रश्न विचारले जातात, त्यानुसार तयारी करणं आवश्यक असल्याचं सुजय सांगतात.

संयम राखण्याबद्दल… 

६ वेळेस मुख्य परीक्षा ३ वेळेस मुलाखती. पहिल्याच प्रयत्नात Combined ची prelim पास करणं परंतू सतत मुलाखतीपर्यंत जाऊन अपयश हा सुजय यांच्यासाठी खूपच कठीण काळ होता. सुजय आपल्या कुटुंबाचे आभार मानतात कारण त्यांनी या काळात खूप साथ दिली. कारण सुजय यांच्याबरोबर कुटुंबानंही संयम ठेवला. मुलगा काय करतो असे प्रश्न विचारणाऱ्या कडे दुर्लक्ष केलं. या काळात मित्रांना, भावंडांना भरगच्च पगाराच्या नोकऱ्या असतात. त्यांचे संसार सुरु होतात हे पाहून अजून संयम ठेवावा लागतो, असं सुजय सांगतात.

अपयश आल्यावर कुटुंब, मित्र यांच्याशी चर्चा करणं आवश्यक नकारात्मक वातावरण बाजूला सारणं आणि सकारात्मकतेकडे जाणं गरजेचं असल्याचं सुजय सांगतात. नापास झाल्यावर DYSP मित्राचा फोन आला आणि त्यांनी सुजय यांची समजूत घालताना तालुक्यात किती जणांनी मुलाखत दिलीये ते बघ, तुझ्या कमतरतेवर काम कर सतत प्रयत्न कर. सतत सकारात्मकता देणाऱ्या जवळच्या लोकांच्या संपर्कात रहायला हवं. आत्मविश्वास ढळता कामा नये. सतत सकारात्मक राहून कष्ट केले पाहिजेत. हे यशाचं गमक आहे. हाच सुजय यांचा नव्यानं प्रयत्न सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole